शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

इथं दहा मिनिटांच्या अंतरावर एक्स्प्रेस थांबेना, पीटलाइन कशी देणार ? रेल्वे संघटनांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 7:06 PM

औरंगाबादच्या पीटलाइनला पहिला प्राधान्यक्रम देण्याची मागणी

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : औरंगाबादच्या मुख्य रेल्वेस्टेशनवरूनरेल्वेने मुकुंदवाडी स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी १० मिनिटे लागतात. १० मिनिटे अंतरावरील स्टेशनवर एक्स्प्रेस रोखता येत नसल्याचे रेल्वेकडून सांगितले जाते. मग औरंगाबादेतील चिकलठाणा येथे पीटलाइन मंजूर असताना जवळपास ६५ कि.मी. अंतरावरील जालना येथेही पीटलाइन कशी मिळू शकते, असा सवाल प्रवासी आणि रेल्वे संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या विविध विभागांमध्ये ३७ पेक्षा अधिक ठिकाणी पीटलाइन आहेत. औरंगाबादेत २००८ पासून पीटलाइनची मागणी केली जात आहे. त्यास रेल्वेने ग्रीन सिग्नल दिला. कधी नांदेड, पूर्णा येथे पीटलाइन आहे, त्यामुळे औरंगाबादेत गरज नाही, असे कारण पुढे केले, तर कधी जागेची अडचण दाखवून मागणी प्रलंबित ठेवण्यात आली. अखेरीस चिकलठाण्यात पीटलाइन करण्यावर शिक्कामोर्तब झाला; पण जालन्यात पीटलाइनच्या घोषणेने चिकलठाण्यातील पीटलाइन संकटात आली. मात्र, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या दोन्ही जिल्ह्यांत पीटलाइन होईल, असे उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले. मात्र, मराठवाड्यातील अनेक रेल्वे प्रकल्पांना निधीसाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते, अशा परिस्थितीत दोन्ही ठिकाणी पीटलाइन खरेच होईल का, त्यासाठी नियम नाही का, असा प्रश्न रेल्वे संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

व्यवहार्य आहे का?औरंगाबाद रेल्वे स्टेशनहून साधारणत: १५ किलोमीटर अंतरावर मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनवर सध्या मराठवाडा एक्स्प्रेस ही एकमेव एक्स्प्रेस आणि इतर पॅसेंजर रेल्वे थांबविल्या जातात. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर तपोवन, जनशताब्दी आणि नंदीग्राम एक्स्प्रेसला येथे थांबा देणे हे व्यावसायिकदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे थांबा देणे व्यवहार्य नसल्याची माहिती ‘दमरे’च्या अधिकाऱ्यांनी दिली. मग दोन पीटलाइन देणे व्यवहार्य आहे का, असा सवाल केला जात आहे.

दीडशे कोटींचा खर्च अपेक्षितदोन्ही जिल्ह्यात पीटलाइन करण्यासाठी किमान दीडशे कोटी रुपयांचा खर्च येईल. इतका खर्च रेल्वे खरेच करणार आहे का? की केवळ निवडणुकीच्या दृष्टीने हे राजकारण आहे, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. मुकुंदवाडीला एक्स्प्रेस थांबवत नाही. त्यामुळे पीटलाइनचे काय होईल, हेही सांगता येत नाही.- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

२००८ पासून मागणीआमचे दोन्ही ठिकाणी पीटलाइन करण्यास स्वागतच असेल; पण औरंगाबादेत चिकलठाण्यात मंजूर झालेल्या पीटलाइनला प्राधान्य पाहिजे. औरंगाबादच्या पीटलाइनचा मुद्दा हा २००८ पासून चालत आलेला आहे. त्यामुळे याच ठिकाणी पीटलाइन पहिली झाली पाहिजे.- अमोल कोरडे, चिकलठाणा संघर्ष समिती

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेraosaheb danveरावसाहेब दानवे