शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

विद्यापीठात पदव्युत्तरच्या प्रवेशासाठी २१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; रिक्त जागांवर थेट प्रवेश

By राम शिनगारे | Published: August 11, 2023 6:57 PM

५५ विभागातील रिक्त जागांवर 'फर्स्ट कम फर्स्ट अॅडमिशन बेसिस'वर हे प्रवेश देण्यात येणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व पदव्यूत्तर विभागात प्रवेशासाठी २१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयकुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. ज्या विभागात जागा रिक्त असतील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येणार आहे.

विद्यापीठातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी पहिल्या तीन टप्प्यात विज्ञान व तंत्रज्ञान, मानव्यविद्या, आंतरविद्या, वाणिज्य व्यवस्थापनशास्त्र या विद्याशाखेसह व्यायवसायीक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन प्रवेश फेरीच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आले. तिनही फेरी झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या सर्व जागांवर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना १८ ते ३१ जुलै या दरम्यान स्पॉट ॲडमिशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पॉट अॅडमिशनच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आले. रिक्त जागांवर 'फर्स्ट कम फर्स्ट अॅडमिशन बेसिस'वर हे प्रवेश देण्यात येणार आहेत. पदव्यूत्तर विभागाच्या तासिका २६ जुलैपासून सुरु झाल्या आहेत. दरम्यान विद्यापीठातील विविध विभागातुन रिक्त असलेल्या जागांवर येत्या २१ ऑगस्टपर्यंत प्रवेश देण्यास मुदतवाढ दिली आहे.

पदवी अभ्यासक्रंमासाठीही मुदतवाढविद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता प्रसिध्द केलेल्या शैक्षणिक दिनदर्शिकेमध्ये निर्धारीत केलेल्या सर्व पदवी व पदव्यूत्तर स्तरावरील अभ्यासक्रमाच्या प्रवेश घेण्याच्या प्रवेश प्रक्रियेची अंतीम तारीख अभ्यासक्रम पूर्ण करुन घेण्याच्या अटीवर २१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. महाविद्यालयांनी पात्रता आवदेन पत्र विहित शुल्कासह ३१ ऑगस्ट पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावे, यापुढे प्रवेशासंबंधी कुठलीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ.संजय कवडे यांनी कळविले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण