राजेश वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : शेतक-यांच्या कापसाला शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा खाजगी बाजारात व्यापारी जादा भाव देत आहेत़ त्यामुळे शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे पाठ फिरवत शेतकरी विक्रीसाठी व्यापा-यांकडे कापूस नेत आहेत.शासनाने गाजावाजा करुन शासकीय कापूस खरेदी केंद्र ठिकठिकाणी सुरू केले़ भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु झाले असून शासनाचा हमीभाव व व्यापाºयांकडून मिळणाºया भावात प्रतिक्विंटल ३०० रुपयांचा फरक आहे़ त्यामुळे कापूस खरेदी केंद्राकडे शेतकºयांनी पाठ फिरवून थेट व्यापारी वर्गाकडे कापूस विक्री सुरु केली आहे.शासकीय कापूस खरेदी केंद्राचा प्रारंभ होवून आठ दिवस उलटले तरी एकाही शेतकºयाची कापसाची गाडी या केंद्राकडे वळली नाही. यामुळे शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी व्यापाºयांनी शेतकºयांकडून कापूस घेण्यासाठी दुकाने थाटली आहेत. अथक प्रयत्नाने वेचलेला कापसाला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही. सध्या कापसाचा शासकीय भाव ४३२० व ४०२० अशा दोन ग्रेडमध्ये दिला जात आहे़ तर व्यापाºयांकडून त्यापेक्षा ३०० रुपये अधिक देवून कापूस खरेदी केली जात आहे़ शेवटी व्यापारी खरेदी करीत असलेल्या कापसावर व्यापाºयांची चांगली कमाई होत आहे, परंतु दिवसरात्र मेहनत करणाºया शेतकºयांना योग्य मोबदला मिळत नाही़ शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण होवून व्यापाºयास परवडते तर शासनास का परवडत नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, पावसाचा लहरीपणा व सततची नापिकी यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना यावर्षी सरकार चांगला भाव देईल, अशी अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्षात अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही कापसाला भाव द्यावा आणि त्यावर बोनस द्यावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे़
कापसाला हमीभावापेक्षा व्यापाºयांकडून जादा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:23 AM