औरंगाबाद: बीड बायपासवरील दत्त मंदिर समोर असलेले एसबीआय एटीएम मशीन रात्री चोरून नेले लाखो रक्कम लंपास झाल्याचा अंदाज.
याविषयी प्राप्त माहीती अशी की सर्वाधिक वर्दळीच्या बीड बायपासच्या दोन्ही बाजूने मोठी नागरी वसाहत आणि व्यापारी संकुल तसेच मंगल कार्यालय झाले आहेत . बायपासवरील दत्त मंदिरासमोर भारतीय स्टेट बॅंकेचे अनेक वर्षापासून एटीएम सेंटर आहे. सेंटरवर दोन एटीएम आहेत,परंतु येथे सुरक्षारक्षक नसतो .शुक्रवारी रात्री चोरट्यायां रोकड लुटण्यासाठी चक्क एक मशीनच चोरून नेल्याचे शनिवारी सकाळी समोर आले . एटीएममध्ये जवळपास २५ लाखाची रोकड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार काल दुपारीच मशीनमध्ये रक्कम जमा करण्यात आली होती.
या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे निरीक्षकमधूकर सावंत आणि अन्य अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देउन चोरट्यान्चा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला हे एटीएम नेण्यासाठी मोठ्या चारचाकी वाहणाचा वापर करण्यात आला असावा आणि चोरट्यांची संख्या अधिक असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे औरंगाबाद शहरातील एटीएम चोरीला जाण्याची घटना प्रथमच घडली . पुंडलिकनगर ठाण्यात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे .