सकाळी ७ ते ११ या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकाने उघडी ठेवण्याचा नियम घालण्यात आला आहे. या काळात इतर व्यावसायिकही चोरून व्यवसाय करीत आहेत. तसेच रस्त्यावरून फिरताना नागरिक मास्क लावत नसल्याचे दिसत आहे. लॉकडाऊन शिथिलच्या काळात बिनधास्तपणे बाजारपेठेत वावरत आहेत. शहरातील टिळक रस्त्यावरील मुख्य बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, वाहनांची वाढती संख्या व खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक यामुळे हा भाग जवळपास १२ वाजेपर्यंत गर्दीने फुललेला असतो. टिळक रस्त्यासह जिल्हा परिषदेच्या मैदानावर भरत असलेली भाजी मंडई, येवला रस्त्यावरील नवी भाजीमंडईचा परिसर, लसीकरण केंद्रे, हे भाग गर्दीची ठिकाणे झाली असून, या भागातील गर्दी नियंत्रणात आणणे गरजेचे झाले आहे. यासाठी पोलीस, नगरपालिका प्रशासनाने सक्रिय होणे आवश्यक आहे.
वैजापुरात कोरोना नियमांचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:05 AM