जालना\चंदनझिरा : फेसबुकवर फेक अकाऊंट उघडून महिलेशी मैत्री करून तिला अश्लिल मेसेज पाठवून ५ लाखांची खंडणी मागणाऱ्या तरूणास चंदनझिरा पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली होती. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली.जालना शहरातील चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवाशी असलेल्या महिलेला तीच्या फेसबुकवर अश्लिल मेसेज आला होता. तसेच ५ लाखांची खडंणीही मागीतली होती. याप्रकरणी सदर विवाहीत महिलेने १० आॅगस्ट रोजी चंदनझिरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. त्या तक्रारीच्या आधारे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या फेसबुकधारकाची माहिती काढली. मात्र अकाऊंट बनावट असल्याचे लक्षात आल्याने त्या फेसबुकवरील असलेल्या फ्रेडसची माहिती काढून त्याद्वारे लोकेशन घेवून बनावट फेसबुकधारकाची माहिती घेतली. असता नितीनकुमार गायकवाड (वय २३ रा. अंबाजोगाई जि. बीड) याने ते अकाउंट काढल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या एका पथकाने अंबाजोगाई येथे जाऊन नितिनकुमारला अटक केली. त्याच्या विरूद्ध सायबल क्रार्इंम तसेच महिलेला अश्लिल मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
फेसबुकवर फेक अकाउंट काढून खंडणी मागितली
By admin | Published: August 20, 2015 12:27 AM