शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

आजारी पडणे 'महाग'; सरकारी रुग्णालयांत निवडक उपचार, खासगीत खिशाचीच ‘सर्जरी’

By संतोष हिरेमठ | Updated: April 7, 2025 15:10 IST

जन आरोग्य योजनेत बसत नसलेल्या आजारांचे उपचार घेताना अनेकांची आर्थिक घडी विस्कटत आहे.

छत्रपती संभाजीनगर : सरकारी रुग्णालये गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरत आहेत, परंतु सरकारी रुग्णालयांत मर्यादित उपचार होत असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागतो, हे आजचे वास्तव आहे. मात्र, खासगी रुग्णालयांतील उपचार सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. जन आरोग्य योजनेत बसत नसलेल्या आजारांचे उपचार घेताना अनेकांची आर्थिक घडी विस्कटत आहे.

दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन पाळला जातो. यावर्षी ‘निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य’ ही या दिनाची संकल्पना आहे. ही संकल्पना माता आणि नवजात बालकांचे आरोग्य आणि जगणे वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते आणि याचे उद्दिष्ट टाळता येण्याजोग्या माता आणि बालमृत्यूंबद्दल जागरूकता वाढवणे आहे. नुकत्याच पुण्यात घडलेल्या गरोदर मातेच्या मृत्यूच्या घटनेने प्रसूतीसाठी येणाऱ्या खर्चाविषयाची चिंता व्यक्त होत आहे.

इतर पॅथींकडे वाढतोय कलॲलोपॅथीतील महागड्या उपचारांमुळे आता अनेक रुग्ण आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, निसर्गोपचार, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर आदी पर्यायी थेरपी निवडत आहेत.

खर्च वाढलाआरोग्यसेवेचा वाढता खर्च अनेकांसाठी परवडणारा राहिलेला नाही. आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करणे, विमा कवचाचा विस्तार, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर भर आदींद्वारे आपण एक निरोगी आणि न्याय्य समाज घडवू शकतो.- डॉ. हिमांशू गुप्ता, अध्यक्ष, मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशन

रुग्णसेवा एक जबाबदारी योजना आणि इन्शुरन्स कंपन्यांच्या अटी, पेमेंटमधील विलंब आणि कागदपत्रांची पूर्तता यामुळे वैद्यकीय सेवा देताना अधिक वेळ, मनुष्यबळ व संसाधन लागते. या सर्व गोष्टी लक्षात घेता, फीमध्ये थोडी वाढ करणे ही एक अपरिहार्य गोष्ट झाली आहे. रुग्णसेवा फक्त व्यवसाय नाही, ती एक जबाबदारी आहे.- डॉ. अनुपम टाकळकर, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य