शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

प्रल्हाद मोदींसमोर नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:42 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या समोरच आज नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका होत होती आणि ती प्रल्हाद मोदी यांना ऐकून घ्यावी लागली.

ठळक मुद्देस्वस्त धान्य दुकानदार व शिधापत्रिकाधारकांचा मोर्चा

जाहीर सभेचा बनला राजकीय आखाडा :प्रल्हाद मोदी-अब्दुल सत्तार यांच्यात रंगली राजकीय जुगलबंदीसत्तार तावातावात निधून गेले सभेतून‘विषयावर’ बोला असे बजावले एका प्रेक्षकाने!औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या समोरच आज नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका होत होती आणि ती प्रल्हाद मोदी यांना ऐकून घ्यावी लागली.‘डीबीटी रद्द करा, पैसे नको, धान्य हवे,’ अशा घोषणा देत आज दुपारी औरंगाबाद जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक व शिधापत्रिकाधारकांचा मोठा मोर्चा काढण्यात आला. क्रांतीचौकापासून सुरू झालेला हा मोर्चा आमखास मैदानावर सभेत रूपांतरित झाला. एका उघड्या जीपमध्ये उभे राहून प्रल्हाद मोदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. समवेत अन्य पदाधिकारीही होते. पंतप्रधानांचे भाऊच मोर्चात असल्याने पोलीस बंदोबस्त तगडा ठेवण्यात आला होता.मोर्चातच नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा सुरू झाल्या होत्या. आमखास मैदानावरील जाहीर सभेत तर राजकीय जुगलबंदीच बघायला मिळाली आणि तीही प्रल्हाद मोदी व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्यात!त्याचे असे झाले की, शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव विलास भुमरे, माजी आमदार अण्णासाहेब माने यांच्या वतीने संतोष माने व जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्या वतीने कृष्णा पाटील डोणागावकर हे या सभेत मंचावर बसले होते. त्यांची भाषणेही झाली. दरम्यान खा. चंद्रकांत खैरे यांचा जाहीर पाठिंबा मोबाईलद्वारे ऐकवण्याचा प्रयत्न झाला; पण तो अयशस्वी ठरला.‘वो सरकार निकम्मी है... वो सरकार बदलनी है...’ चौकटनागपूरचे आर. एस. अंबुलकर यांनी सर्व राजकीय पक्षांनी डीबीटीचा प्रश्न हाताळावा, असे आवाहन करीत ‘वापस लो वासप लो... डीबीटी वापस लो’, ‘रेशन आमच्या हक्काचं... नाही कुणाच्या बापाचं’, ‘रोजी रोटी दे न सकी, वो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है,’ अशा घोषणा दिल्या व त्या उपस्थितांकडून वदवून घेतल्या.सभा सुरू होताच एक महिला स्टेजजवळ आली आणि म्हणाली, ‘आधी पुड्या बंद करा. कॅन्सर होऊन पोरं मरायला लागली;’ पण तिचे म्हणणे कुणी विचारातच घेतले नाही. सविता मोकळे या कार्डधारक महिलेचे भाषण मोठे रंजक झाले. तिनेही नरेंद्र मोदी यांचे नाव घेत टीका केली. डीबीटी लागू झाल्यास रेशनवर गहू २० रुपये किलो व तांदूळ २७ रुपये किलो अशा चढ्या भावाने विकले जाणार असल्याचा इशारा डी.एन. पाटील यांनी यावेळी दिला, तर रॉकेल ६२ रुपयांनी विकले जाणार आहे. एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादagitationआंदोलन