व्यंकटेश वैष्णव बीडजिल्हा परिषदेत निवडून गेलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांत कौटुंबिक गोतावळा पहायला मिळणार आहे. तीन कुटुंबातील सहा जण एकाचवेळी सभागृहात पोहोचले आहेत. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये माता- पुत्र, चुलती - पुतणे व पती- पत्नीचा समावेश आहे.माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगल सोळंके गंगामसला गटातून निवडून आल्या तर तेलगाव गटातून पुतणे जयसिंह सोळंके यांनी जि.प. मध्ये निवडून जाण्याचा मान मिळविला. दुसरीकडे काकू- नाना आघाडीचे प्रमुख संदीप क्षीरसागर हे नवगण राजुरी या ‘होमपिच’मधून विक्रमी मतांनी निवडून आले. याचवेळी त्यांच्या मातोश्री सुरेखा क्षीरसागर बहीरवाडी गटातून विजयी झाल्या. युसूफवडगाव गटात सारिका बजरंग सोनवणे या राकॉच्या उमेदवार विजयी झाल्या. त्यांचे पती व सभापती बजरंग सोनवणे यांनी चिंचोलीमाळी गटातून राकॉतर्फे मुसंडी मारली. एकूणच जि.प. च्या सभागृहात नात्यागोत्यांचा प्रभाव राहील.आडसकरांना ‘हाबाडा’केज तालुक्यातील भाजपचे नेते रमेश आडसकर यांच्या पत्नी व विद्यमान जि.प. सदस्या अर्चना आडसकर व पुतणे ऋषीकेश आडसकर या दोघांनाही पराभव पत्करावा लागला. अर्चना आडसकर यांना सारिका सोनवणे यांनी ६८९ मतांनी बाजी मारली. ऋषीकेश आडसकर यांच्यावर बजरंग सोनवणे यांनी ७३७ मतांनी मात केली. पतीच्या पराभवाचा ‘हिशेब’ बरोबरबीड पालिका निवडणुकीत काकू- नाना आघाडीचे रवींद्र क्षीरसागर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांच्या पत्नी सुरेखा क्षीरसागर यांनी बहीरवाडी गटातून विजय मिळवून पतीच्या पराभवाचा हिशेब बरोबर केला.
नव्या सभागृहामध्ये कौटुंबिक गोतावळा !
By admin | Published: February 24, 2017 12:24 AM