औरंगाबाद : 'आमची मदत करा. काव्या ला सर्व जण ओळखतात. तिचा मोबाईल पण आमच्या जवळ आहे. तिच्याकडे केवळ दोनच हजार रुपये आहे. शुक्रवारी दुपारीपासून काव्या घरी परतली नाही. तिच्याबद्दल माहिती मिळाली तर आम्हाला छावणी पोलिसांना कळवा.', अशी आर्जव करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध युट्युबर बिनधास्त काव्याच्या आईवडिलांनी शेअर केला आहे.
शहरातील १५ वर्षांची बिनधास्त काव्या ही प्रसिद्ध युट्युबर आहे. ती शुक्रवारी दुपारी घरातून बाहेर पडली आहे. त्यानंतर ती घरी परतली नाही. तिचा मोबाईल देखील घरीच असून तिच्याकडे मोजकेच पैसे आहेत. यासंबंधी धावणी पोलिसांत मिसिंगची तक्रार आई वडिलांनी दिली आहे. पीएसआय केदार पुढील तपास करत आहेत. आई वडीलही तिला शोधत असून काव्याला शोधण्यासाठी मदतीचे आवाहन करत आहेत. आज छावणीत गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने पोलीस बंदोबस्तात व्यस्त आहेत.
५ मिलिअन्स पेक्षा अधिक आहेत फॉलोअर्सबिनधास्त काव्या तिच्या नटखट स्वभावामुळे सर्वांची आवडती आहे. लहान मुले, तरुण आणि आबालवृद्धांमध्येही तिचे रील्स चांगलेच लोकप्रिय आहेत . तिचे युट्यूबवर साडेचार मिलियन पेक्षाजास्त तर इंस्टाग्रामवर १ मिलिअन फॉलोअर्स आहेत.