शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

शेतकरी केशर आंब्यातून मालामाल; छत्रपती संभाजीनगरातून तीन देशांत १२५ टन आंब्याची निर्यात

By बापू सोळुंके | Published: August 22, 2024 8:24 PM

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे ४०० एकर क्षेत्रांवर केशर आंब्याची लागवड करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : आपल्या जिल्ह्यातील शेतकरी पिकवित असलेला केशर आंबा अमेरिका, जपान आणि इंग्लंड या देशवासीयांच्या पसंतीला उतरला आहे. केशर आंबा निर्यातीतून जिल्ह्यातील शेतकरी मालामाल होत आहे. यासोबतच जिल्ह्यातील मोसंबी बांगलादेशाला, तर डाळिंब अबुधाबी, दुबईला निर्यात होते.

आंब्याची निर्यात सुमारे १२५ टनांवरछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे ४०० एकर क्षेत्रांवर केशर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. यासोबतच शेतकरी आता अतिघन पद्धतीने केशर आंब्याची लागवड करीत आहे. यावर्षी जिल्ह्यातून सुमारे १२५ टन केशर आंब्याची युराेपात निर्यात झाली होती.

जिल्ह्यात आंब्याचे ३३३७ हेक्टर क्षेत्रछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आंब्याचे ३३३७ हेक्टरवर पारंपरिक गावरान आंब्याचे क्षेत्र आहे. यात केवळ ४०० एकर क्षेत्र हे केशर आंब्याचे असल्याची माहिती आहे. केशर आंब्याची लागवड दरवर्षी वाढत आहे. केशर आंब्यातून मिळणारे उत्पादन अन्य पिकांच्या तुलनेत अधिक असल्याने शेतकरी केशर आंब्याच्या शेतीकडे वळत असल्याचे दिसून येते.

तालुका --------------             क्षेत्र (हेक्टरमध्ये)छत्रपती संभाजीनगर- ५५८पैठण--- ५२०फुलंब्री- ५७२वैजापूर- ४८५गंगापूर-२४०खुलताबाद-३१३सिल्लोड-२३९सोयगाव-३३कन्नड--३७२

तीन देशांत केली जाते निर्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जपान, इंग्लंड आणि अमेरिका या तीन देशांना केशर आंब्याची निर्यात होते. पूर्वी जहाजामार्गे होणारी निर्यात आता विमानाने होत असल्याने आंबा लवकर बाजारपेठेत पोहोचतो.

आंब्याची शेती लाभदायककेशर आंब्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांनी यावर्षी एकरी साडेसात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे. केशर आंब्याला युरोपियन बाजारपेठेत चांगली मागणी असते. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केशर आंबा शेतीकडे वळावे. अतिघन लागवडीतून लवकर उत्पादन मिळते. अन्य कोणत्याही शेतीपेक्षा केशर आंब्याची शेती लाभदायक आहे.- डाॅ. भगवानराव कापसे, कृषी अभ्यासक.

निर्यात करण्याऐवजी येथेच विक्रीपूर्वी आम्ही केशर आंबा निर्यात करीत होतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निर्यातीपेक्षा अधिक दर आपल्या बाजारात मिळतो. यामुळे आम्ही निर्यात करण्याऐवजी येथेच पॅकिंग करून आंबा विक्री करतो. केशर आंब्याची शेती किफायतशीर आहे. शेतकऱ्यांनी घनदाट पद्धतीने केशर आंब्याची लागवड करावी. --सुशील बलदवा, माजी अध्यक्ष केशर आंबा उत्पादक संघ.

कृषीमालाची निर्यात वाढावीछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून केशर आंब्याची युरोपियन देशांना निर्यात होते. शिवाय डाळिंबाची दुबई आणि अबुधाबीला निर्यात होते. जिल्ह्यातील कृषीमालाची निर्यात वाढावी, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत आहोत.- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक.

टॅग्स :MangoआंबाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र