फुलंब्री : तालुक्यातील धामणगाव येथील शेतकऱ्याला वायर जोडणी करताना शॉक लागला. त्याला तत्काळ खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून यात शेतकरी आजीनाथ भागाजी भोजने जखमी झाले आहे. शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी ते गेले होते; पण कृषीपंप सुरू करण्यासाठी विद्युत प्रवाह नसल्याने ते वायरची जोडणी करण्यासाठी पोलवर चढले होते.
यादरम्यान एक फिडरमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्यांना शॉक लागला. विजेचा जोरदार झटका बसल्याने शेतकरी भोजने खालच्या तारेवर अडकले. शिवजयंतीची सर्वत्र धामधूम सुरू असल्याने बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची नजर अचानक आजीनाथ भोजने यांच्यावर पडली. भोजने पोलच्या तारेवर अडकलेले पाहून त्यांनी शिवजयंती उत्सव मिरवणुकीत बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास तसेच नागरिकांना याबाबत माहिती दिली. नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेत तारेवर अडकलेल्या आजीनाथ भोजने यांना बांबूच्या साहाय्याने खाली ढकलले. यादरम्यान खाली असलेल्या नागरिकांनी त्यांना अलगद झेलले. नागरिकांनी भोजने यांना तातडीने फुलंब्री येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
--- कॅप्शन : धामणगाव परिसरातील विद्युत पोलवर अशा पद्धतीने शेतकरी आजीनाथ भोजने अडकले होते.
190221\rauf usman shaik_img-20210219-wa0051_1.jpg
--- कॅप्शन : धामणगाव परिसरातील विद्युत पोलवर अशा पद्धतीने शेतकरी आजीनाथ भोजने अडकले होते.