--
औरंगाबाद ः गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतुन ११० अपघातग्रस्तांनी लाभासाठी दावे डिसेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० दरम्यान दाखल केले. त्यापैकी १६ अपघातग्रस्तांना लाभ देण्यात आला असून ७४ प्रकरणे कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी प्रलंबीत तर १७ प्रकरणांची कारवाई प्रगतीपथावर आहे.
----
जि. प. नव्या इमारतीसाठी
लवकर स्थलांतराच्या सुचना
---
औरंगाबाद ः जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग स्थलांतरीत झाल्यावर आरोग्य, पंचायत, कृषी, पशुसंवर्धन, स्वच्छता, यांत्रिकी, समाज कल्याण विभाग लवकर स्थलांतरीत करण्याच्या सुचना अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी सोमवारी संबंधीत विभागप्रमुखांना दिल्या आहेत. तर मुख्य इमारतीतील विभागही ऐनवेळी हलवण्याची गरज पडल्यास त्याच्याही पर्यायी व्यवस्थेचा विचार सुरु असल्याचे कवडे यांनी सांगितले.
----
बर्ड फ्ल्युच्या १२ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा
---
औरंगाबाद ः जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्ल्युची नोंद झालेली नाही. पैठण आमडापूर येथील गुंटेवाडी येथे २० कोंबड्या दगावल्याची पशुसंवर्धन विभागाकडे नोंद असून तेथील पाच नमुने पुणे येथे पाठवले आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत तिथे एकाही कोंबडीचा मृत्यू झाला नाही. हिरडपुरी येथील ६ कोंबड्यांचा मृत्यू झाला. तेथील ४ नमुने पुण्याला पाठविले. हिमायतबाग येथील किंगफिशर, सोनवाडी येथे २ कावळ्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात २९ पक्षांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १२ नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवले असून अहवाल आलेले नाही.
पुढील एक दोन दिवसांत हे अहवाल येतील. जिल्ह्यात सध्या एकही मृत्यू बर्ड फ्ल्युने झाल्याची नोंद नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. प्रशात चाैधरी यांनी सांगितले.