आडूळ (औरंगाबाद ) : पीक कर्ज आणि एकरकमी कर्ज परतफेड योजनेच्या प्रश्नांवर आडूळ परिसरातील शेतकऱ्यांनी आज दुपारी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेचे अंतर्गत कामकाजही बंद पाडले.
औरंगाबाद - बीड महामार्गावर आडूळ हे मुख्य बाजार पेठेचे गांव असून याठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव शाखा आहे. परिसरातील तब्बल ३५ खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक व्यवहार या बँकेशी निगडित आहे. खरिप हंगाम संपत आला तरीही शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळाले नाही. यासाठी दररोज शेतकरी बँकेत चकरा मारतात. तसेच सन २०२० मध्ये शासनाच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज खाते बँकेतील कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार करून बंद केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणे आहे. एकाही शेतकऱ्याला नवीन पीक कर्ज मिळाले नाही. यामुळे त्रस्त झालेल्या परिसरातील शेतकऱ्यांनी आज आठवडी बाजाराच्या दिवशीच दुपारी बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. बँके विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून काही वेळापर्यंत बँकेचे अंतर्गत कामकाज बंद पाडले होते. शाखा व्यवस्थापक प्रसाद आलूरकर यांनी येत्या ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत एकरकमी कर्ज परतफेड योजनेची खाते बंद करून रखडलेले नवीन पीक कर्ज प्रकरण तात्काळ मार्गी लावण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शेतीत तोटा झाल्याने देशी जुगाड केला, शुद्ध हळद डोळ्यांसमोर दळून देत पैसा कमावला
पंचायत समिती सदस्य शुभम पिवळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जि प चे माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास गोरे, कामगार नेते हारूण पठाण, भाऊसाहेब वाघ, नवनाथ सांगळे, पोलिस पाटील भाऊसाहेब पिवळ, भास्कर गिते, पाटिलबा बोन्द्रे, भीमराव ढाकणे, सतिश राख, शेख जाहेर, आडूळ खुर्दचे उपसरपंच प्रेमसिंग घुसिंगे,सतिश बचाटे,रामु पिवळ,अशोक भावले,शाम्मद सय्यद,भगवान पोपळघट,आसाराम गोर्डे,अंकुशराव जावळे, बंडू गवळी, आनंद कासलीवाल, शिवलाल राठोड, शेरू पठाण, हिरालाल राठोड, शेख अजिम, आडूळ खुर्दचे सरपंच तुळशीराम बताडे, राजू गोडसे, मुजीब पठाण, कुंडलिक आगलावे, नवनाथ आगळे, भीमराव पिवळ, शेख राजू आदींसह रजापूर, घारेगाव, एकतुनी, देवगाव, गेवराई आगलावे, हिरापुर, ब्राम्हणगांव आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी पाचोड पोलिस ठाण्यातील सा पो नि गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार जगन्नाथ उबाळे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
ऊस प्रश्नांवर जलसमाधी आंदोलन; पोलिसांची तटबंदी भेदून आंदोलकांच्या गोदावरी पात्रात उड्या