शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

गोदाकाठावरील शेतकऱ्यांवर ‘संक्रांत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:37 AM

अनधिकृत पाणी उपसा भोवणार : ३५० जणांवर पोलीस कारवाईची टांगती लतवार

गंगापूर : तालुक्यातील गोदावरी नदीकाठावर असलेल्या ३२ गावांतील ३०० ते ३५० शेतकºयांवर जायकवाडी प्रकल्पातून अनधिकृत पाणी उपसा केल्याप्रकरणी कारवाईची टांगती तलवार कायम असल्याने शेतकºयांनी धसका घेतला आहे.जायकवाडीच्या जलफुगवट्यातून पाणी उचलण्याची परवानगी नसणाºया शेतकºयांवर सदर कारवाई होणार असून या संदर्भात संबंधित विभागाने मागील महिन्यात वर्तमानपत्रात जाहिरात देऊन शेतकºयांना पाणी प्रस्ताव दाखल करून परवानगी घेण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, काही शेतकºयांनी पाणी परवानगी घेतली, मात्र अजूनही अनेक शेतकºयांनी पाणी परवानगी घेतली नाही. अशा शेतकºयांविरोधात कारवाई करण्यात येत असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली .सोमवारी दुपारी ४ वाजता जायकवाडी पाटबंधारे पैठण विभागांतर्गत येणाºया गंगापूर शाखेतर्फे सदर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. यासाठी संबंधित विभागाच्या कर्मचाºयांनी काही शेतकºयांसह पोलीस ठाणे गाठले होते. शेतकºयांनी कारवाईसंदर्भात लगेच निर्णय न घेता अजून एका महिना सवलत द्यावी, या कालावधीत पाणी परवानगी काढून घेऊ, असे सांगून वेळ मागून घेतली. मात्र, विभागाचे अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.शेतकºयांचे म्हणणे...सध्या कांद्याला बाजारभाव नाही, उसाचे देखील वांधे झाले आहेत. उसाला तोड मिळत नसल्याने शेतकरी कारखानदारांकडे चकरा मारत आहेत. या शिवाय ज्या शेतकºयांचा ऊस गेला, त्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत. अशा परिस्थितीत पैसे उपलब्ध होणार कसे, या विवंचनेत शेतकरी असतानाच पोलिसात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून यामुळे शेतकºयामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. संबंधित विभागाकडून सुरुवातीला प्रति कनेक्शन १२०० रूपयांची मागणी करण्यात आली होती. आता मात्र यात वाढ करुन २२०० रूपयांची मागणी करण्यात येत आहे. सदर मागणी अवाजवी असल्याचे येथे शेतकरी देविदास वाघ म्हणाले. यावेळी जामगाव व कायगाव येथील शेतकरी उपस्थित होते. या कारवाईमुळे शेतकरी भांबावले असून संबंधित विभागास शेतकºयांच्या उद्रेकाला समोर जाण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या गावात होणार कारवाईगंगापूर तालुक्यातील जामगाव, नेवरगाव, बगडी, हैबतपूर, ममदापूर, कायगाव, नवाबपूर, गणेशवाडी, अमळनेर, लखमापूर, गळनिंब, आगरवाडगाव, सावखेडा, मांडवा आदींसह ३२ गावातील ३०० ते ३५० शेतकºयाविरोधात कारवाई होणार असल्याने संबंधित विभागाप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल नव्हता.

 

टॅग्स :water shortageपाणीकपातRevenue Departmentमहसूल विभाग