औरंगाबाद : उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळावा. एका वर्षात हे शक्य नाही; पण येत्या पाच वर्षांत का होईना शेतकºयांचा सातबारा कोरा करावा, असे वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
बामसेफच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी ते शुक्रवारी औरंगाबादला आले होते. अधिवेशनात भाषण करून झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. मातोश्रीवर मी उद्धव ठाकरे यांना भेटलो. एनआरसी व सीएएमुळे ४० टक्के हिंदू बाधित कसे होतात, हे त्यांना समजावून घ्यायचे होते. महाराष्टÑात हे कायदे लागू करणार नसल्याचे मला ठाकरे यांनी सांगितले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.