भराडी : सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सर्वनत्र (लिक्वीड नायट्रोजन)चा १९ फेब्रुवारीपासून तुटवडा आहे. वरिष्ठ कार्यालयाकडूनही पुरवठा होत नसल्याने गायीचे कृत्रिम रेतन करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून, खासगी मेडिकलमधून सर्वनत्र विकत घ्यावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला हकनाक भुर्दंड पडत आहे. भराडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी एम. बी. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, १९ फेब्रुवारीपासून वरिष्ठ कार्यालयातून लिक्वीड नायट्रोजनचा पुरवठा झालेला नाही. लवकरच पुरवठा करण्यात येणार असल्याचे वरिष्ठांनी सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. भराडी हे बाजारपेठेचे गाव असल्यामुळे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यावर पंचक्रोशीतील अनेक गावचे शेतकरी अवलंबून आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन लवकरात लवकर लिक्वीड नायट्रोजनचा पुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
फोटो : भराडी येथील पशुवैद्यकीय दवाखाना.