शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

जिल्ह्यातील ३२१ गावांतील शेतकऱ्यांना मिळणार २५ टक्के विम्याची रक्कम

By विकास राऊत | Published: September 06, 2023 1:43 PM

पंतप्रधान पीकविमा योजना; अधिसूचना जारी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांत पावसाचा १६ ते ४० दिवसांचा खंड पडला आहे. २० महसूल मंडळांत सलग २१ हून अधिक दिवसांचा खंड पडला आहे. तेथील पिकांच्या उत्पादनात ५० टक्के घट येणार असल्याचा अंदाज तालुकास्तरीय समितीने व्यक्त केला आहे. त्यानुसार पीकविमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूलता या बाबीखाली शेतकऱ्यांना २५ टक्के भरपाई देण्याची अधिसूचना जारी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिले. यामुळे ३२१ गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, प्रभोदय मुळे, विमा कंपनी, स्कायमेट, शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील पेरणी व पावसाचा खंडपीकविमा योजना खरीप हंगाम-२०२३ च्या जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक मंगळवारी झाली. जिल्ह्याचे खरीप हंगामातील सरासरी पेरणी क्षेत्र ६ लाख ८४ हजार ७१६ हेक्टर इतके असून त्यापैकी ६ लाख ५८ हजार १२३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ऑगस्टअखेर ४३१ मिलिमीटर पर्जन्यमान अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ २७६ मिलिमीटर म्हणजेच ६४.१४ टक्के इतकेच पर्जन्यमान झाले आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांत १६ ते ४० दिवस पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांची अवस्था बिकट आहे.

कोणत्या तालुक्यात सर्वेक्षण?औरंगाबाद तालुक्यातील ४, फुलंब्री तालुका १, वैजापूर तालुका १० व गंगापूर तालुक्यातील ५ मंडळे आहेत. या मंडळाअंतर्गत ३२१ गावे असून त्यांचे सर्वेक्षण तालुकास्तरीय समितीमार्फत केले. अहवालानुसार मका, कापूस व सोयाबीन पिकांच्या उत्पादकतेत ५० टक्के घट शक्य आहे.

कृषी अधिकारी काय म्हणाले?औरंगाबाद तालुक्यातील ४ महसूल मंडळांतील ६८ गावे, फुलंब्री तालुक्यातील एका मंडळातील २४ गावे, वैजापूर तालुक्यातील १० मंडळांतील १३३ गावे, गंगापूर तालुक्यातील ५ मंडळांतील ९६ गावे अशा एकूण २० मंडळांतील ३२१ गावांमधील पीकविमा संरक्षित शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.-प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद