औरंगाबाद : बोंड अळी बाधित कपाशीची हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीकरिता संतप्त शेतकºयांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत अचानक शिरकाव करून आत्मदहनाचा प्रयत्न केला. गंगापूर तालुक्यातील वजनापूर या गावातील सात ते आठ शेतक-यांनी बाटलीत आणलेले रॉकेल अंगावर टाकल्याने एकच गोंधळ उडाला.विशेष म्हणजे राज्याचे फलोत्पादन संचालक व येथील पालक संचालक प्रल्हाद पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहानूरमियाँ दर्गा परिसरातील कार्यालयात आढावा बैठक सुरू होती. विभागातील सर्व अधिकारी बैठकीला हजर होते. सकाळी ११.३० ते दुपारी १२ वाजेदरम्यान जि.प.चे माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली १५ ते २० शेतकरी घोषणा देत अचानक कार्यालयात आले. शेतकºयांच्या हातात बोंड अळी लागलेले कपाशीचे परदड होते. काही शेतकºयांनी कपाशीच्या बोंडाचे तोरण कार्यालयाला बांधले. ‘ सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’ अशा घोषणा देत सर्वजण थेट बैठकीमध्ये शिरले. प्रल्हाद पोकळेसोबत विभागीय कृषी सहसंचालक प्रताप कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांच्यासमोर संतापलेल्या शेतकºयांनी बाटलीतून आणलेले रॉकेल अंगावर टाकून घेतले. यामुळे एकच गोंधळ उडाला. अधिकाºयांमध्ये धावपळ माजली. यावेळी काही मिनिटांतच पोलीस फाटा घटनास्थळी पोहोचला. तोपर्यंत शेतकºयांना शांत करण्यात अधिकाºयांना यश आले होते. कपाशीवरील बोंड अळी बाधित शेतकºयांच्या शेताचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी आंदोलनकर्त्यांच्या वतीने संतोष जाधव यांनी मागणी केली. शेतकºयांचा संताप दूर करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी लगेच कृषी आयुक्तांच्या नावे एक पत्र टाईप केले व त्यातील येथील शेतकºयांच्या मागण्या मांडण्यात आल्या. या पत्राची एक प्रत आंदोलनकर्त्या शेतक-यांना देण्यात आली. लेखीपत्र घेऊनच शेतकरी कार्यालयाबाहेर पडले.येत्या आठवडाभरात पंचनामे होणारकपाशीवरील बोंड अळीमुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात कृषी विभागातर्फे शेतकºयांचे तक्रार अर्ज भरून घेतले जात आहेत. पुढील आठवडाभरात पंचनामेही पूर्ण करण्यात येतील व शासनाला त्याचा अहवाल पाठविण्यात येईल.-प्रल्हाद पोकळे, फलोत्पादन संचालकतथा पालक संचालकहेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावीजिल्ह्यात सुमारे ७५ टक्के कपाशीची लागवड झाली. संपूर्ण कपाशीवर बोंड अळी पडल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. शेताचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी.-संतोष जाधव, माजी सभापतीअर्थ व बांधकाम (जि. प.)शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार१० एकरात कपाशी लावली होती. अवघी १० क्विंटल कपाशी हातात आली. जिथे ७० ते ८० क्विंटल अपेक्षित होती. बाजारात विक्रीला आणेपर्यंत ६० ते ८० हजारांपर्यंत खर्च आला. ६ हजार भाव पाहिजे होता, पण ४००० ते ४२०० रुपये क्विंटल कपाशी विक्री होत आहे. बोंड अळीने मोठे नुकसान झाले. कपाशीला भाव नाही. सततच्या नुकसानीमुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार.-राजेंद्र चव्हाण,वजनापूर, ता. गंगापूर