फुलंब्री (जि. औरंगाबाद) : समृद्धी महामार्गात गेलेली आपली जमीन चौघांनी तलाठ्यासोबत संगनमत करून परस्पर नावावर केल्याचे कळताच शेतकºयाने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी फुलंब्री पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेला जबाबदार असलेल्या तलाठ्याची चौकशी सुरू केली आहे.पोलिसांनी सांगितले की, औरंगाबाद तालुक्यात कृष्णापूरवाडी येथील शेतकरी भावसिंग छगन सुंदर्डे (६५) यांच्या नावे दहा एकर २० आर. जमीन आहे. यातील १ हेक्टर १ आर जमीन समृद्धी महामार्गात जात आहे. याचा मोबदला मोठ्या प्रमाणात मिळणार म्हणून गावातील निहालसिंग सुंदर्डे, खुशालसिंग सुंदर्डे, महासिंग सुंदर्डे, परमजितसिंग धिल्लो या चौघांनी तलाठी पुंजाबा बिरारेसोबत संगनमत करून, भावसिंग यांची २ एकर ३ आर जमीन परस्पर नावावर केली. वास्तविक पाहता, भावसिंग सुंदर्डे यांची ज्या गट नं. ६ मध्ये जमीन आहे, त्या गटात वरील लोकांची जमीन नसताना त्यांच्या नावावर जमीन असल्याचे सातबारामध्ये दाखविण्यात आल्याने भावसिंग यांना धक्काच बसला. २३ नोव्हेंबर रोजी भावसिंग शेतात असताना चौघे तेथे आले. त्यांनी हुज्जत घातली. ही जमीन आमची आहे, अशी धमकी दिली. यामुळे भावसिंग यांनी २५ नोव्हेंबर रोजी अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शेतकºयाच्या मुलाने लगेच तक्रार देताच, फुलंब्री पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून निहालसिंगला अटक केली. उर्वरित तीन आरोपी फरार आहेत.>आत्महत्येस तलाठीच जबाबदारतलाठी पुंजाबा हे माझ्या वडिलांच्या आत्महत्येस जबाबदार असून, त्यांनी आमची जमीन दुसºयाच्या नावावर केली नसती, तर हे प्रकरण घडले नसते, असा आरोप मुलगा धरमसिंग यांनी केला आहे.
तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याने शेतक-याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 6:29 AM