शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

तुकडाबंदीमुळे शेतकरी सावकारी पाशात; अत्यावश्यक वेळीही विकता येईना जमीन

By विकास राऊत | Published: November 09, 2022 7:37 PM

१५ महिन्यांपासून अर्धा एकरपेक्षा कमी जागा विक्री होत नसल्याने अल्पभूधारकांची कोंडी होत आहे.

- विकास राऊतऔरंगाबाद : राज्य मुद्रांक विभागाने १२ जुलै २०२१ पासून तुकडाबंदी नियमाचे परिपत्रक काढल्यामुळे शेतकरी १५ महिन्यांपासून पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी सावकारी पाशात अडकत चालला आहे. जमीन विकताना तुकडाबंदीचे नियम आडवे येत आहेत. त्यामुळे शिक्षण, वैद्यकीय उपचार खर्च, मुलांच्या विवाहासाठी शेतकऱ्यांना जमीन विकणे अवघड झाले आहे. खरेदी-विक्रीचे व्यवहार रखडल्यामुळे तुकडाबंदीच्या नियमांत शिथिलता आणण्याची गरज व्यक्त होत आहे. कर्जबाजारी होऊन अनेकांना कुटुंबातील मंगल कार्य उरकावे लागले आहे. तुकडाबंदीमुळे सावकारांकडे जमिनी गहाण टाकण्याची वेळ येत आहे.

एनए-४४ वगळता इतर सर्व घरे, जागा, प्लॉटची रजिस्ट्री १५ महिन्यांपासून बंद असली तरी मुद्रांक विभागात दलालांच्या मध्यस्थीने तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे मध्यंतरी उघडकीस आले होते. १५ महिन्यांपासून अर्धा एकरपेक्षा कमी जागा विक्री होत नसल्याने अल्पभूधारकांची कोंडी होत आहे.

सध्या या व्यवहारांना परवानगी८० आर जिरायती, २० आर बागायती जमिनीवरच खरेदी-विक्रीच्या व्यवहारास सध्या परवानगी आहे. एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र दोन एकर असेल, तर त्यातील एक, दोन किंवा तीन गुंठे जागा विकत घेता येत नाही. त्यांची रजिस्ट्री होत नाही. जमिनीचे अधिकृत ले-आऊट करून घेतले तरच रजिस्ट्री होईल. प्रमाणापेक्षा कमी क्षेत्र असेल तर त्याच्या खरेदी-विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते. एखाद्या जागेच्या तुकड्याचा भूमी अभिलेख विभागाकडून स्वतंत्र मोजणीचा नकाशा असेल, तर त्याच्या विक्रीसाठी परवानगीची गरज नाही. मात्र, त्याचे विभाजन करण्यासाठी तुकडाबंदीचे नियम लागू असतील.

काहीही निर्णय नाहीयाबाबत औरंगाबाद खंडपीठात नागरिकांनी याचिका दाखल केली होती. मे २०२२ मध्ये सुनावणीअंती तुकडाबंदी मागे घेतली जाईल, अशी शक्यता होती. परंतु पुण्यातील महानिरीक्षक कार्यालयाने सात महिन्यांपासून त्याबाबत काहीही निर्णय घेतला नाही. या विरोधात गेल्या महिन्यात संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.

मुद्रांक विभागाचे मुख्यालयाकडे बोटजिल्हा मुद्रांक विभागाच्या मते, १२ जुलैचे परिपत्रक एका जनहित याचिकेच्या निकालानुसार काढलेले आहे. त्यामुळे महानिरीक्षक कार्यालयाकडूनच याबाबत कायदेशीर स्पष्टीकरण देण्यात येईल. असे सांगून मुख्यालयाकडे सहा महिन्यांपासून बोट दाखविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांसाठी जाचक नियमतुकडाबंदी शेतकऱ्यांसाठी जाचक आहे. खरेदी-विक्री बंद असल्यामुळे अल्पभूधारक शेतकरी भरडला जात आहे.-भारत आहेर, प्रगतीशील शेतकरी, टोणगाव, औरंगाबाद

अन्यथा सावकारी फोफावेलनोकरदार व व्यापाऱ्यांना पैसा उभारता येतो. शेतकऱ्यांना मात्र जमीन हेच एक साधन आहे. या कायद्याच्या बंधनांमुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे या कायद्याच्या प्रमाणभूत क्षेत्रात बदल होणे गरजेचे आहे, अन्यथा सावकारी फोफावण्याचा धोका आहे.-सतीश तुपे, नायब तहसीलदार (से.नि.)

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRevenue Departmentमहसूल विभाग