शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
2
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
3
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
4
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
5
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
6
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
7
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
8
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम
9
“तुतारीला मोठे यश मिळेल, राज्यात मविआची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही”: हर्षवर्धन पाटील
10
केवळ गंमत म्हणून पाठवला सलमानला धमकीचा संदेश; झारखंडमधून एकाला बेड्या
11
"मोठी डील झालीय"; तिकीट कापल्यानंतर चंद्रिकापुरेंचे थेट पत्र; म्हणाले, "अजित पवारांनी खंजीर खुपसला"
12
IND vs NZ : Sarfaraz Khan नं टणाटण उड्या मारत कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी' 
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
14
अंबानी डोक्यालाच हात लावणार! पठ्ठ्याने JioHotstar डोमेनच स्वत:च्या नावावर केला; वर म्हणाला,'संपर्क साधा' 
15
“मित्रपक्षांना चालत नाही, तो चेहरा राज्याला कसा चालेल”; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
16
एकाच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडणूक लढविणाऱ्या एकमेव महिला, दोनदा यश, तीनदा अपयश
17
"यांच्या स्वभावातच कोणाशी..."; वांद्रे पूर्वमध्ये उमेदवार देताच ठाकरेंवर झिशान सिद्दीकींची खोचक पोस्ट
18
₹९०० पर्यंत जाऊ शकतो Paytm चा शेअर, ५ महिन्यांत १२०% ची तेजी; शेअर वधारला
19
Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देणारा निघाला भाजीवाला, मागितलेले ५ कोटी
20
नागिणीने घेतला खुनी बदला, एकापाठोपाठ एक ५ जणांना दंश केला, ३ जणांचा मृत्यू

गतवर्षीच्या संततधार, अवकाळीची शेतकऱ्यांना मिळणार आठ दिवसांत भरपाई

By बापू सोळुंके | Published: September 01, 2023 7:02 PM

माजी आ. हर्षवर्धन जाधव यांचे ठिय्या आंदोलन: विमा कंपनी आणि जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिले लेखी आश्वासन          

छत्रपती संभाजीनगर: गतवर्षी संततदार पाऊस आणि अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र विमा कंपनीने नुकसानभरपाई न दिल्याने कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जिल्हा कृषीअधीक्षक कार्यालयात ठिय्या देताच, कृषी अधीक्षक आणि विमा कंपनी प्रतिनिधीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आठ दिवसांत नुकसानभरपाई जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले. 

यावर्षी अत्यल्प पावसामुळे संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत. मुसळधार पाऊस न पडल्यामुळे नदी,नाले कोरडे पडलेले आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण शेतकरी चिंतीत आहेत. गतवर्षी संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पिकाची अंती पैसेेवारी ५० पैसेपेक्षा कमी असल्याचा अंतिम पीक कापण अहवाल डिसेंबर २०२२मध्ये प्रशासनाने दिला होता. याअहवालाच्या आधारे पीक विमा कंपनीने तात्काळ शेतकऱ्यांना खरीप हंगामाची नुकसानभरपाई देणे आवश्यक होते.मात्र अद्याप शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसानभरपाई दिली नव्हती. याप्रश्नावर माजी आ. हर्षवर्धन जाधव यांनी शुक्रवारी दुपारी 2 ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत  जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सुमारे दोन तास ठिय्या दिल्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधी पी.आर. कांबळे यांनी आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले.  सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आंदोलन सुरूच होते.

जिल्ह्यातील ६०टक्केच शेतकऱ्यांनाच नुकसानभरपाई का?डिसेंबर २०२२मध्ये प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्याची पीक पैसेवारी ५० पैसेेपेक्षा कमी आहे. असे असताना प्रशासनाने एकूण पीक पेऱ्यांच्या ६० टक्केच क्षेत्रावरील पिकांना नुकसानभरपाई का देऊ केली, असा सवाल कृषी अधीक्षकांना केला. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर कृषी अधीक्षक यांना देता आले नाही. शेवटी त्यांनी शंभर टक्के शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित आहे, याबाबतची कार्यवाही करण्याचे पत्रही कृषी अधीक्षकांनी जाधव यांना दिले.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादRainपाऊस