आता आर्द्रा नक्षत्रास सुरुवात झाली आहे. हे नक्षत्र काय करील, अशा चिंतेत शेतकरीवर्ग आहे. मृग नक्षत्रात मुगांची पेरणी केली जाते. मृग नक्षत्राशिवाय मूग पेरणी शेतकरी वर्ग करीत नाही. त्यामुळे यंदा मुगाची पेरणी झाली नाही. मृग नक्षत्राच्या थोड्या पावसात मका, कापूस इत्यादींची लागवडीस सुरुवात झाली. परंतु मृग नक्षत्राने दगा दिल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला असून विहिरीतील पाण्याने ठिबक किंवा स्प्रिंकलरने पाणी देण्याचे काम काही शेतकरी वर्ग करत आहेत. परंतु कोरडवाहू शेतकरी चिंतेत सापडला आहे. काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र आता पाऊस नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे आहे. ज्यांनी लागवड केलीच नाही ते आता पाऊस कधी येईल लागवड कधी होईल या चिंतेत आहेत. बियाणे, खते खरेदी केली आता लागवड कधी होईल याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांना चिंता दुबार पेरणीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:04 AM