शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
2
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
4
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
5
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
6
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
7
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
8
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
9
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
10
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
11
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
12
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
13
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
15
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
16
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
17
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
18
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
19
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
20
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर

देखाव्यातून दर्शविली शेती, पाण्याची अवस्था

By admin | Published: April 20, 2016 12:31 AM

औरंगाबाद : पावसाच्या अवकृपेने मराठवाडा दुष्काळाच्या वणव्यात होरपळत आहे.

औरंगाबाद : पावसाच्या अवकृपेने मराठवाडा दुष्काळाच्या वणव्यात होरपळत आहे. अशा भयंकर परिस्थितीत जगण्याची उमेदच गमावून बसलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची परिस्थिती पाहून मंगळवारी हजारो लोकांच्या डोळ्यांत अश्रू आले. भगवान महावीर जयंतीनिमित्त मंगळवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत वर्धमान रेसिडेन्सी परिवारातर्फे चिमुकल्यांनी सादर केलेल्या देखाव्याने सर्वांचे मन हेलावून टाकले.हा देखावा सादर करण्यासाठी गेले काही दिवस १९ मुला-मुलींनी मोठे परिश्रम घेतले. दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या या काळात चिमुकल्यांनी पाणी बचतीचा संदेश देण्याबरोबर शेतकऱ्यांच्या आयुष्यातील या घटनांवर देखाव्यातून एक प्रकारे भाष्यच केले. शेतात काम करताना बैल मेल्यानंतर स्वत:च नांगराला जुंपणारा शेतकरी, निसर्गाच्या लहरीपणामुळे कर्जात अडकणारा शेतकरी आणि या सगळ्यातून शेवटी गळ्याभोवती दोरखंड आवळणारा शेतकरी, असे हृदयाला भिडणारे विविध क्षण पाहताना प्रत्येक जण काही क्षणांसाठी भावुक होऊन गेला. शेतकऱ्याला जगण्याची उमेद देण्यासह वृक्षतोड टाळणे, पाणी वाचवा, असे विविध संदेशही चिमुकल्यांनी आपल्या सादरीकरणातून समर्पकपणे दिले. सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांनी कौतुक करीत चिमुकल्यांचा सन्मान केला. देखाव्यासाठी रोहित महाजन यांनी परिश्रम घेतले.नऊवार, डोक्यावर कलशशोभायात्रेत चंद्रप्रभू खंडेलवाल दिगंबर जैन मंदिरांतर्गत महिला मंडळातील सर्व महिला नऊवार नेसून आल्या होत्या. डोक्यावर कलश घेऊन महिला भजन गात पुढे जात होत्या. बालाजीनगरातील कल्पतरू कुं थूनाथ जैन मंदिराच्या वतीने फेटे बांधून शोभायात्रेत सहभागी झाले होते. तसेच नमोकार भक्ती मंडळाचे अ‍ॅड. यतीन ठोले, राजकुमार पांडे, संतोष मुगदिया, नीलेश पहाडे, मयूर ठोले, विशाल ठोले. गुरू मिश्री युवा मंडळाचे कुंतिलाल हिरण, स्वप्नील पारख, स्वप्नील सकलेचा, संदीप खिंवसरा, अजिंक्य संघवी, सागर ब्रह्मेचा, मयूर बोथरा. शांती ग्रुपचे महेंद्र बंब, विशाल कांकरिया, रोहित छाजेड, हितेश कांकरिया, मनोज शिगवी, अजिंक्य शिंगवी, शुभम शिंगवी, अमित काला. जैन इंजिनिअरिंगचे अध्यक्ष नितीन बोरा, आनंद मिश्रीकोटकर, सुनील सेठी, राजेश पाटणी, कमल पहाडे, मुकेश ठोले, चेतन ठोले. जैन सोशल ग्रुपचे विपीन गुजराणी, राजेंद्र पगारिया, सुनील शिसोदिया, प्रशांत बिनायके, किशोर पांडे, नीरज बडजाते,अनुज दगडा. जैन अलर्ट ग्रुपचे अजित चंडालिया, नीलेश जैन, मनोज जैन. अरिहंत ग्रुपचे स्वप्नील पारख, सचिन बंब. अर्हम ग्रुपचे स्वाती मल्हारा, आकाश संकलेचा, नवदीप मरलेचा, शुभम बांठिया, निर्भय काठेड. परमेष्ठी ग्रुपचे प्रीतेश बोरा, किशोर सकलेचा, संतोष मुगदिया. मनोज छाबडा, अशोक गंगवाल, नरेंद्र अजमेरा, पीयूष कासलीवाल यांनीही सहभाग नोंदविला. २४३ दात्यांनी केले रक्तदानभगवान महावीर जयंतीनिमित्त स.भु. महाविद्यालयाच्या मैदानावर भगवान महावीर मेडिकल फाऊंडेशनतर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता महारक्तदान शिबिरास प्रारंभ झाला. या शिबिरात समाजबांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.शिबिरात रक्तदान करण्यासाठी युवक, महिला व युवतींनीही मोठा सहभाग नोंदविला. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून रक्तदानाद्वारे एखाद्याचा प्राण वाचू शकतो. त्यातूनच शिबिरात २४३ दात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचे अनुपम दर्शन घडविले.घाटी रुग्णालय येथील विभागीय रक्तपेढी, दत्ताजी भाले रक्तपेढी, औरंगाबाद रक्तपेढी, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल रक्तपेढी, अमृता रक्तपेढी, लोकमान्य रक्तपेढी, लायन्स रक्तपेढी, अर्पण व्हॅलेंटरी रक्तपेढी आदी रक्तपेढ्यांचे डॉक्टर आणि कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. तुषार चुडीवाल, डॉ. शैलेश चांदीवाल, डॉ. ईश्वर ललवाणी, डॉ. सुभाष लुनावत, डॉ. प्रफुल्ल संचेती, डॉ. नरेंद्र खटोड, डॉ. सुशील बोरा आदींनी सहकार्य केले. तसेच अर्हम युवा सेवा ग्रुपच्या वतीने थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.यावेळी थॅलेसेमियाविषयी जनजागृती करणारी चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी शिबिरात ३०० जणांची थॅलेसेमियाची तपासणी करण्यात आली. आयोजित केलेल्या या शिबिरातून ‘जिओ और जिने दो’चा संदेश देण्यात आला.