लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : समृद्धी महामार्ग विरोधी कृती समितीतर्फे तालुक्यातील तीन गावातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयासमोर गुरुवारपासून साखळी उपोषण सुरु केले. या महामार्गासाठी संपादित जमिनीसाठी शासनाने वाढीव मावेजा द्यावा, जबरदस्तीचे भूसंपादन त्वरित थांबवावे, दरपत्रकात दुरुस्ती करावी, तालुक्यातील इतर गावांप्रमाणेच आगरसायगाव, जांबरगाव व कनकसागज या गावातील शेतकऱ्यांना प्रति एकरी २८ ते ३५ लाख रुपये भाव द्यावा, सात बारावरील कर्ज माफ करावे व प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे आदी मागण्या आहेत.या आंदोलनात महेश राजपूत, अशोक वगदे, बाळासाहेब जाधव, प्रदीप वगदे, गणेश खवले, गणेश बेडवाल, किसन जाधव, प्रताप डुमाले, रमेश बेडवाल, रामनाथ साळवे, राजेंद्र गवळी, पोपट भोसले, सुरेश गुंजाळ, आप्पासाहेब गुंजाळ, संतोष साठे, भगवान साठे, योगेन घाडगे, सुदाम गवळी,अण्णा साठे, उत्तम साठे, किसनसिंग डुमाले, भागीनाथ साठे आदींनी भाग घेतला. तहसीलदार सुमन मोरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन मागण्या शासनापर्यंत पोहचवण्याचे आश्वासन दिले. कॉ. सुभाष लोमटे, अण्णा खंदारे, कल्याण डुमले, जि.प. सदस्य रमेश बोरनारे, पंकज ठोंबरे, प्रशांत सदाफळ यांनी भेट देऊन विचारपूस केली.
‘समृद्धी’विरोधात उपोषण सुरू
By admin | Published: July 14, 2017 12:36 AM