: तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
वाळूज महानगर : पडीत शेतजमिनीचे जेसीबीने सपाटीकरण करणाऱ्या पिता-पुत्रास मारहाण केल्याची घटना शुक्रवार (दि.२०) दुपारी विटावा शिवारात घडली.
या दोघा पिता-पुत्रास मारहाण करणारे रतन रंगनाथ जाधव, मच्छिंद्र रंगनाथ जाधव व उत्तम जाधव (सर्व रा. एकलेहरा, ता. गंगापूर) यांच्या विरोधात किशन गुजर याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशन भवरलाल गुजर (२९, रा. रांजणगाव) व त्यांचे वडील भवरलाल गुजर हे दोघे शुक्रवारी विटावा शिवारातील गट क्रमांक ८० मध्ये जेसीबीने जमीन सपाटीकरण करीत असताना हा प्रकार घडला. किशन व भवरलाल यांना शिवीगाळ करून मारहाण केली व ते पळून गेले होते.
----------------------------