शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटताना वर पित्यावर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 3:15 PM

या घटनेत अन्य एक जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

औरंगाबाद: मुलाची लग्न पत्रिका देण्यासाठी पाहुण्यांच्या वर्कशॉपमध्ये आलेल्या वरबापाचा लोखंडी रॅक खाली दबून अंत झाल्याची घटना पडेगाव येथे शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत अन्य एक जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

दत्तू नामदेव तायडे (५४,रा. पडेगाव)असे मृताचे नाव आहे. तर उत्तमराव पवार(रा.पडेगाव)हे या घटनेत किरकोळ जखमी झाले. याविषयी प्राप्त माहिती अशी की, दत्तू तायडे यांच्या धाकटा मुलगा किशोर यांचा विवाह २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. किशोरच्या लग्नाची पत्रिका घेऊन तायडे, त्यांचा मोठा मुलगा प्रवीण हे शनिवारी सकाळी साडेदहा ते पावणे अकरा वाजेच्या सुमारास पडेगाव येथील त्यांचे नातेवाईक अजीनाथ केशवराव पंडित यांच्या फेब्रीकेशनच्या वर्कशॉपमध्ये गेले होते.

यावेळी पंडित यांच्या टेबलसमोरील खुर्चीवर तायडे पिता-पुत्र आणि उत्तमराव पवार बसलेले होते. पत्रिका दिल्यानंतर लग्नाला या असे त्यांनी हक्काने पंडित यांना सांगितले. यावेळी अचानक दत्तू तायडे यांच्यामागील सुमारे पंधरा ते वीस फुट लांबीचे आणि ३ ते ४ टन वजनी लोखंडी अँगल ठेवलेले रॉक कोसळले. याघटनेत दत्तू हे टेबल आणि रॅकखाली दबल्या गेले. तर पवार यांच्या अंगावरही काही लोखंडी वस्तू पडल्या, तर या घटनेत प्रवीण आणि वर्कशॉपमालक पंडित यांना कोणतीही दुखापत झाली नाही. यावेळी आरडाओरड झाल्याने वर्कशॉपमधील कामगार, प्रवीण आणि अजीनाथ यांनी रॅक आणि लोखंडी अँगल्सखाली दबलेल्या दत्तू यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्यावर पडलेला लोखंडी रॅक, पाईप आणि अँगल्स खूप वजनी होते.

हे सर्व साहित्या उचलण्यासाठी सुमारे पंधरा ते वीस मिनिटे लागली. यानंतर सर्वांनी मिळून रॅक आणि टेबलमध्ये दबलेल्या दत्तू यांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढले. या घटनेत त्यांच्या डोक्याला, मानेला, पाठीचा आणि कमरेचा मणका तुटून ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता, अपघात विभागातील डॉक्टरांनी दत्तू यांना तपासून मृत घोषित केले. याविषयी छावणी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दत्तू तायडे होते रेल्वेचे कर्मचारीमृत दत्तू हे भारतीय सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर रेल्वे खात्यात नोकरीला लागले होते. त्यांचे मूळ गाव अंधारी आहे. ते पडेगाव येथे पत्नी, दोन मुलांसह राहात होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूAccidentअपघात