लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीने होत असून यावेळी दोनच्या ऐवजी चार वॉर्डांचा एकाच प्रभागात समावेश करण्यात आला आहे. परंतु त्यासाठी असलेल्या अपुºया मशीनमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे़महापालिका निवडणुकीतील उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाकडून इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीनची व्यवस्थाही करण्यात आली असून काही प्रभागात केवळ दोनच मशीन चार उमेदवारांसाठी राहणार आहेत तर काही प्रभागात तीन आणि अन्य प्रभागात चार मशीन उपलब्ध राहणार आहेत. एकाच मशीनवर दोन उमेदवारांना मतदान हे अशिक्षित, वृद्ध मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारे ठरणार आहे. यातून क्रॉस वोटींग, एकाच उमेदवाराला मतदान तसेच बाद मतांचे प्रमाणही वाढणार आहे.निवडणुकीसाठी ८०० कंट्रोल युनिट आणि जवळपास अडीच हजार इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन राहणार आहेत. शहरात मनपा निवडणुकीसाठी ५५० मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. यातील प्रत्येकी एका मतदान केंद्रावर जवळपास ६०० ते ७५० मतदान राहणार आहे तर व्हीव्ही पॅटचा वापर होणाºया एका मतदान केंद्रावर जवळपास साडेपाचशे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. उमेदवारांची निश्चिती झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीनवरही उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार चार ईव्हीएम मशीन लागणारे सहा प्रभाग आहेत. त्यात ८, ९, १३, १५,१६ आणि १८ या प्रभागांचा समावेश आहे तर तीन मशीन लागणारे ११ प्रभाग शहरात आहेत. त्यामध्ये १, २, ३, ४, ५, ७, ११, १२, १४, १९ आणि २० या प्रभागाचा समावेश आहे तर केवळ दोन मशीन लागणारे तीन प्रभाग असून ६, १० आणि १७ या क्रमांकाच्या प्रभागात दोनच मशीन राहणार आहेत. निवडणुकीत एका प्रभागात चार वॉर्ड आहेत. त्यामुळे सामान्य मतदार हा मतदान केंद्रावर चार मशीनवर मतदान करावे लागेल, या अपेक्षेने जाईल मात्र तीन प्रभागात केवळ दोनच मशीन राहणार आहेत. तर ११ प्रभागात तीन मशीन राहणार आहेत.
अपुºया मशीनमुळे संभ्रमाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 12:39 AM