सकाळी ९ वाजेपासूनच शहरातील विविध मंदिरांमध्ये संक्रांतीचे वाण देण्यासाठी महिलांची मोठी गर्दी दिसून आली. धावणी मोहल्ला येथील विठ्ठल मंदिर, एन-९ येथील रेणुकादेवीचे मंदिर, गारखेडा येथील ओंकारेश्वर मंदिर यासह सगळीच देवस्थाने आणि विशेषत: विठ्ठलाची मंदिरे महिलांच्या गर्दीने फुलून गेली होती. कोरोनापासून संरक्षण म्हणून मास्क लावून आणि सॅनिटायझर घेऊनच महिला घराबाहेर पडल्या होत्या; पण मैत्रिणींशी गप्पा करताना आणि वाण देण्याच्या नादात या सर्व गोष्टींचा महिलांना काही काळ नकळत विसर पडलेला दिसला.
इतर सणांच्या तुलनेत हा सण तरी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करता आला, म्हणून महिलांनी समाधान व्यक्त केले आणि कोरोनाचे संकट नव्या वर्षात पूर्णपणे टळू दे, अशी मनोकामना करत सण साजरा केला.