औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने महाविद्यालयांचे शैक्षणिक आॅडिट करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी महाविद्यालयांना २० हजार रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार होते. मात्र त्यास काही प्राचार्यांनी विरोध दर्शविल्यामुळे शुल्कांचा निर्णय रद्द केला असून, तपासणीसाठी येणाऱ्या समिती सदस्यांचे टी.ए.,डी.ए. संबंधित महाविद्यालयांना द्यावे लागणार आहे.विद्यापीठाने संलग्न असलेल्या ४१७ महाविद्यालयांपैकी ३० टक्के महाविद्यालयांचे विद्यापीठ कायद्यानुसार शैक्षणिक आॅडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. या महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक आॅडिटसाठी तीनसदस्यीय समिती पाठविण्याचा निर्णय घेतला होता. या समितीमध्ये विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राबाहेरील दोन आणि विद्यापीठातील एक, अशा तीन सदस्यांची समिती पाठविण्यात येणार होती. या शैक्षणिक आॅडिटसाठी येणाºया खर्चांच्या पूर्ततेसाठी विद्यापीठ प्रशासनाने २० हजार रुपयांचे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यास काही प्राचार्यांनी विरोध दर्शविल्यामुळे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी सोमवारी प्राचार्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीला व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. देशमुख, संजय निंबाळकर, डॉ. राजेश करपे, किशोर शितोळे, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे यांच्यासह इतर प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत महाविद्यालयांना आकारण्यात येणारे शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी महाविद्यालयांना १ हजार रुपये नोंदणी शुल्क आकरण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयांमध्ये आॅडिटसाठी पाठविण्यात येणाºया समितीमधील सदस्य हे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राबाहेरील असतील, असाही निर्णय घेण्यात आला. या सदस्यांच्या टी.ए., डी.ए.चा खर्च संबंधित महाविद्यालयांना करावा लागणार असल्याची माहिती प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी दिली. तसेच आॅडिटसाठी अर्ज करण्याची मुदत ११ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.कोटशैक्षणिक आॅडिट करताना ज्या महाविद्यालयांचे ‘नॅक’कडून मूल्यांकन होणार आहे, त्या महाविद्यालयांना प्राधान्याने संधी देण्यात येईल. आतापर्यंत अनेक महाविद्यालयांनी आॅडिट करावे, अशी विनंती विद्यापीठ प्रशासनाला केली आहे. यानुसार प्रक्रिया राबवून आॅडिट केले जाईल.-डॉ. अशोक तेजनकर, प्रकुलगुरू-------------
महाविद्यालयांच्या शैक्षणिक आॅडिटचे शुल्क रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 11:11 PM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने महाविद्यालयांचे शैक्षणिक आॅडिट करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी महाविद्यालयांना २० हजार रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार होते. मात्र त्यास काही प्राचार्यांनी विरोध दर्शविल्यामुळे शुल्कांचा निर्णय रद्द केला असून, तपासणीसाठी येणाऱ्या समिती सदस्यांचे टी.ए.,डी.ए. संबंधित महाविद्यालयांना द्यावे लागणार आहे.
ठळक मुद्देविद्यापीठ : अर्ज दाखल करण्यासाठी ११ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ