लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिवसा घरफोडी करणाºया महिला टोळीतील दोघींना गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींनी तीन गुन्ह्याची कबुली दिली असून, १८,५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व इतर साहित्य पोलिसांनी जप्त के ले.वंदना विजू गायकवाड (३0), अमरीन सतीश साळवे (२५, रा. गारखेडा परिसर) अशी या दोन महिलांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे फौजदार नंदकुमार भंडारे व त्यांचे पथक गस्त घालीत होते. चोरीचे साहित्य विक्री करण्यासाठी दोन महिला पीरबाजारात येणार आहेत, अशी माहिती खबºयाकडून मिळाल्याने पथकाने सापळारचला.भारतनगर गारखेडा परिसरातून आलेल्या दोघींना त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्यागोण्या व पिशव्यांची झडती घेतली असता १८,५०० रुपयाचे सोन्या-चांदीचे दागिने व साहित्य मिळून आले.या पथकाने केली कारवाई...फौजदार नंदकुमार भंडारे, सहायक फौजदार महाडिक, पोहेकॉ फारुक देशमुख, संजय धुमाळ, संतोष सोनवणे, विकास माताडे, राहुल हिवराळे, संजय जाधव, शिवाजी भोसले, महिला कर्मचारी चांदे, सुलताना शेख, प्राजक्ता वाघमारे, चिंचोळकर, पवार आदींचा पथकात समावेश होता.
घरफोडी करणारी महिलांचीही टोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 1:02 AM