लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रसूतीसाठी दाखल झाल्यानंतर गरोदर मातेसोबत महिला नातेवाईकास प्रसूती कक्षात येऊ देण्याची सुविधा देत घाटी रुग्णालयाने सुरक्षित मातृत्वासाठी आणखी एक पाऊल टाकले आहे. प्रसूतीदरम्यान डॉक्टर-परिचारिकांबरोबर आई, सासू, बहीण यांच्याकडून गरोदर मातांची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे सिझेरियनचे प्रमाण कमी होण्यास हातभार लागत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.रुग्णालयात दुर्व्यवहारापासून मुक्ती, प्रसूतीदरम्यान सोबतीसाठी व्यक्तीची निवड, एकांतता तथा गोपनीयता, सन्मानपूर्ण व्यवहार, भेदभावापासून मुक्ती, उच्चस्तरातील आरोग्य देखभाल आणि कोणत्याही प्रकारच्या दबावापासून मुक्ती हे गरोदर मातांचे ७ हक्क आहेत.या सर्व हक्कांचे पालन घाटी रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागात होत आहे. घाटी रुग्णालयात दररोज ५० ते ६० प्रसूती होतात. प्रसूतीसाठी जिल्हाभरातून गरोदरमाता घाटीत दाखल होतात. गेल्या वर्षभरात याठिकाणी तब्बल १७ हजार ९३७ प्रसूती झाल्या.यामध्ये ९ हजार १२० मुले, तर ८ हजार ४४८ मुलींचा जन्म झाला. प्रसूती कक्षात (लेबर रूम) गरोदरमाता आणि डॉक्टर, कर्मचारी असतात.यापुढे जाऊन घाटी रुग्णालयाने दिलेल्या हक्कानुसार गरोदरमातेसोबत आई, सासू अथवा बहीण यापैकी एकाला येऊ देण्याची सोय करून दिली जात आहे. यामुळे प्रसूतीदरम्यान मातेची अधिक काळजी घेण्यास मदत होत आहे.यातून सुलभ प्रसूती होऊन माता मृत्यू-सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे, असे घाटीतील डॉक्टरांनी सांगितले.अनावश्यक वाद टळण्यासही यामुळे होणार मदतमुलगा की मुलगी यावरून अनेक रुग्णालयांत वाद होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. विविध उपायांमुळे घाटी रुग्णालय यास अपवाद ठरत आहे.प्रसूतीनंतर मुलगा झाला की मुलगी हे सर्वात आधी मातेला सांगितले जाते. याबरोबर आता सोबत असलेल्या महिला नातेवाईकांस ही बाब कळण्यास मदत होत आहे.नोंदणी आवश्यकज्या गरोदरमातांना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, ज्या अधिक घाबरतात, अशांसोबत आई, सासू, बहीण यांना सोबत घेता येते. घाटीत दररोज होणाऱ्या प्रसूतीची संख्या अधिक आहे. त्यामुळे यासाठी प्रसूतीपूर्व तपासणीच्या वेळी नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित आणि सन्मानयुक्त प्रसूतीसाठी प्रयत्न सुरू आहे.-डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग, घाटी
गरोदर मातेसोबत महिला नातेवाईक प्रसूती कक्षात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 12:04 AM
प्रसूतीसाठी दाखल झाल्यानंतर गरोदर मातेसोबत महिला नातेवाईकास प्रसूती कक्षात येऊ देण्याची सुविधा देत घाटी रुग्णालयाने सुरक्षित मातृत्वासाठी आणखी एक पाऊल टाकले आहे. प्रसूतीदरम्यान डॉक्टर-परिचारिकांबरोबर आई, सासू, बहीण यांच्याकडून गरोदर मातांची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे सिझेरियनचे प्रमाण कमी होण्यास हातभार लागत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
ठळक मुद्देघाटी रुग्णालय : सुरक्षित मातृत्वासाठी आणखी एक पाऊल