लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘सबसे सस्ता इतवार, कोई भी सब्जी लो १० रुपये में १० गड्डी... इससे सस्ता नहीं मिलेगा कहीं, लो भाई लो सोचो मत आज सस्ता कल का भरोसा नहीं ’... असे ओरडत जाधववाडीतील अडत फळ-भाजीपाला बाजारात पालेभाज्या विकल्या जात होत्या. मेथी,पालक, चुका, कोथिंबीर १ रुपयाला गड्डी विकूनही शिल्लक राहिलेल्या शेकडो पालेभाज्या तिथेच टाकून शेतकरी निघून गेले. त्या पालेभाज्यांवर नंतर गायी, म्हशींनी मनसोक्त ताव मारला.रविवारच्या पहाटे जाधववाडीतील फळ भाजीपाल्याच्या अडत बाजारात पालेभाज्यांची विक्रमी आवक झाली होती. जिकडे तिकडे भाज्याच भाज्या दिसत होत्या. अवघ्या १० रुपयांत १० गड्डी मेथी विकल्या जात होती. पालेभाज्यांमध्ये सर्वाधिक मेथीची भाजी विकल्या जाते. तिच १ रुपया गड्डी मिळत असल्याने बाकीच्या पालेभाज्यांचे भावही गडगडले. पालक, शेपू, कोथिंबीर, पुदिना १० रुपयांना १० गड्डी, तर १० रुपयाला कांदापात, २ रुपयाला मोठा मुळा, अळूच्या पानाच्या ५ गड्डी १० रुपयाला विकल्या जात होत्या. प्रत्येक शेतकरी व विक्रेत्यासमोर भाज्यांचा ढीग होता. त्यातून निवडून निवडून भाज्या खरेदी केल्या जात होत्या. भाज्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती. सिडको-हडको व आसपासच्या परिसरातील हजारो ग्राहक भाज्या खरेदीसाठी जाधववाडीत आले होते. फळ भाज्यांमध्ये वांगे, फुलकोबी, पत्ताकोबी ५ रुपये किलो, काकडी २ ते ५ रुपये किलो विकत होती. एवढ्या मातीमोल भावात पाले व फळभाज्या विक्री होऊनही शेकडो गड्ड्या शिल्लक राहिल्या त्या तिथेच सोडून शेतकरी व विक्रेते घरी गेले. यानंतर या भाज्यांवर गाई,म्हशींनी मनसोक्त ताव मारला. अडत व्यापारी इलियास बागवान यांनी सांगितले की, जाधववाडीत १५ ते २० टन फळभाज्यांची आवक झाली.गुजरातचा बटाटा मातीमोलमध्य प्रदेश, पंजाबमधून नवीन बटाट्याची आवक सुरू झाली आहे. गुजरातमध्ये शीतगृहात बटाट्याचा बंफर साठा करून ठेवण्यात आला आहे. भाव गडगडत असल्याने शीतगृहातील बटाटा मातीमोल भावात विकला जात आहे. औरंगाबादेत रविवारी ठोक विक्रीत २ ते ३ रुपये प्रतिकिलोने गुजराती बटाटा विकला गेला, तर इंदोरचा बटाटा ६ रुपये किलोने विकला जात होता.जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बटाट्याचे ठोक व्यापारी मुजीबशेठ जम्मूशेठ यांनी सांगितले की, गुजरातमध्ये शीतगृहात बटाट्याचा जुना साठा मोठ्या प्रमाणात आहे. तिथे फुकटमध्ये बटाटा दिला जात आहे. हमाली व गाडीभाडे भरूनही औरंगाबादेत या बटाट्याला २०० ते ३०० रुपये क्विंटलपेक्षा जास्त भाव मिळाला नाही.इंदोरहून येणारा बटाटा ६०० रुपये क्विंटल विकत आहे. हा बटाटा आतून पांढºया रंगाचा असून चवीला फिकट असतो. यामुळे इंदोरच्या बटाट्याला मागणी आहे. जाधववाडीत दररोज १० ट्रकपेक्षा अधिक बटाट्याची आवक होत आहे. नवीन बटाटा साठविण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेशातील शीतगृह जुना बटाटा लवकर विकून मोकळे होत आहेत. परिणामी, बटाटा मातीमोल भावात विकला जाऊ लागला आहे.शेतकºयांच्या डोळ्यात अश्रूलासूर स्टेशन येथील गाजगाव येथून वांग्याचे २० कॅरेट विक्रीला घेऊन आलेले विशाल रांगेकर स्वत:च वांगे विकत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी ६० रुपये किलोने वांगे विकले होते. आज ५ रुपये किलोने वांगे विकावे लागत होते, तरीही निम्मे वांगे शिल्लक राहिल्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. भाड्याचेही पैसे निघाले नाही, अशीच परिस्थिती अन्य शेतक-यांची झाली होती.