शेंद्रा : मालवाहतूक करणारा भरधाव ट्रक शेंद्रा शिवारातील एका घरात शिरल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या प्रकारानंतर पोबारा केलेल्या ट्रकचालकाविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औरंगाबाद-जालना महामार्गावर शेंद्रा शिवारातील पुलाजवळ राजू कचकुरे हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. मालवाहतूक करणारा ट्रक (एमएच ४६, एच १२८०) लोखंडी गेट तोडून थेट कचकुरे यांच्या घरात शिरला. ट्रकच्या धडकेने तीन दुचाकींचा अक्षरश: चुराडा झाला तसेच तळमजल्यावरील खोलीची भिंत ढासळली. कचकुरे यांच्या कुटुंबातील सदस्य पहिल्या मजल्यावरील खोल्यांत झोपले असल्याने संभाव्य हानी टळली. भूकंपासारखा हादराट्रक घरावर धडकताच भूकंप झाल्यासारखा हादरा बसल्याचे कचकुरे यांनी सांगितले. प्रचंड आवाज झाल्याने कचकुरे कुटुंबियांनी तातडीने बाहेर धाव घेतली. या धडकेने त्यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घराला धडकल्यानंतर ट्रकचालक फरार झाला. राजू कचकुरे यांच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादहून जालन्याकडे जाताना शेंद्रा परिसरातील पूल ओलांडण्यापूर्वी वळण आहे. या ठिकाणी नेहमी लहान-मोठे अपघात घडतात. अपघातप्रवण क्षेत्र असल्याबद्दल रस्ते विकास महामंडळाने तेथे धोक्याचा इशारा देणारे फलक लावणे गरजेचे आहे; परंतु संबंधितांकडून पावले उचलली जात नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
भरधाव ट्रक घरात शिरला
By admin | Published: May 31, 2016 11:52 PM