शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

गावातील सोसायटीतच मिळणार खत; नऊ परवाने, शेतकऱ्यांचीही सोय !

By स. सो. खंडाळकर | Published: December 08, 2023 7:24 PM

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६९२ विकास सोसायट्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर : पीएमकेएसके म्हणजे पंतप्रधान किसान समृध्दी केंद्र योजनेंतर्गत देशभरातील विविध कार्यकारी सोसायट्यांना १५१ प्रकारचे उद्योग करण्याची परवानगी मिळणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा बँकेशी संलग्न ६९२ विकास सोसायट्यांना खत विक्रीचा परवाना दिला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पूर्वीपासूनच खतविक्री करीत असलेल्या असलेल्या नऊ सोसायट्यांना परवाना मिळून गेलेला आहे.

जिल्हा बँकेशी संलग्न सोसायट्यांना परवानेछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६९२ विकास सोसायट्या आहेत. त्या सोसायट्यांना १५१ प्रकारचे उद्योग सरता येऊ शकतील. बी-बियाणे व खतविक्री आधीपासूनच करीत असलेल्या नऊ सोसायट्यांना हे परवाने मिळून गेलेले आहेत.

जिल्ह्यात नऊ सोसायट्यांना परवानेआधीच बी - बियाणे व खतविक्री करणाऱ्या नऊ संस्थांना परवाने मिळालेले आहेत. त्यापैकी लाडसावंगी, पिंप्रीराजा हे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील, चिकलठाण, जैतखेडा व वडाळी हे कन्नड तालुक्यातील, धानोरा, पालोद व अंधारी हे सिल्लोड तालुक्यातील व पैठण हे पैठण तालुक्यातील. याप्रमाणे या सोसायट्या आहेत. जिल्ह्यातील १५० सोसायट्या अ व ब वर्गातल्या आहेत. त्यांनी पुढे यायला पाहिजे. ८२ सोसायट्यांनी कॉमन सर्विस सेंटरसाठी अर्ज केलेले आहेत. त्या सुरुही झालेल्या आहेत. जनऔषधीसाठी ७ सोसायट्यांनी, ग्रीन स्टोअरेजसाठी ७ सोसाट्यांनी अर्ज केलेले आहेत. पेट्रोलपंप हर्सूल विकास सोसायटीला सुरू करता येईल. कन्नडच्या दाभाडी सोसायटीनेही पेट्रोल पंपासाठी अर्ज केला आहे.

कर्जवाटपासोबत आता किरकोळ खतविक्रीही करणारविविध सहकारी सोसायट्या त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार कर्जवाटप तर करीतच असतात. पण, आता या १५१ उद्यागांचे दालनही त्यांना खुले झाले आहेत. त्यापैकी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सभासदत्व घेण्यासाठी काही सोसायट्या पुढे आल्या आहेत. भारतीय बीज सहकरी संस्थेच्या सभासदत्त्वासाठी १५ सोसायट्या, भारतीय निर्माण सहकारी संस्थेच्या सभासदत्त्वासाठी दोन सोसायट्या व भारतीय सेंद्रिय शेती सहकारी संस्थेच्या सभासदत्त्वासाठी एक सोसायटी उत्सुक आहे.

खत दुकाने चालविण्यासाठी घ्या पुढाकारसोसायटी नफ्यात आहे का, तिची स्वत:ची जागा आहे का, या गोष्टींवर बरेच अवलंबून आहे. बी - बियाणे व खतविक्रीचे परवाने घेण्यासाठी सोसायट्यांनी पुढे येण्याची गरज आहे. नव्या सोसायट्यांनीही पुढाकार घेतला पाहिजे.

सोसायट्यांच्या सक्षमतेवर अवलंबूनदेशभरातील विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत एकूण १५१ प्रकारचे उद्योग सुरू करता येणार आहेत. अर्थात हे सोसायट्यांच्या सक्षमतेवर अवलंबून आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज करणे, नोंदणी करणे व निकषात बसले तर परवानगी देणे, या बाबी सुरू आहेत. त्यादृष्टीने जिल्हानिहाय आढावे घेतले जात आहेत. जिल्हा पातळीवर याच्या समन्वयाचे काम जिल्हा उपनिबंधक करीत आहेत.-जे. बी. गुट्टे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र