सिल्लोड: अजिंठा येथील बुलडाणा अर्बन बँकेच्या जळगाव -सिल्लोड रस्त्यावरील वेअर हाऊसला मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांच्या कापसाच्या गठाणी जाळून खाक झाल्या. सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीवर आज सकाळी नियंत्रण मिळवण्यास यश आले.
अहमदनगर, वैजापूर येथील व्यापाऱ्यांच्या कापसाच्या गठाणी या वेअर हाऊसमध्ये असल्याची माहिती आहे. जवळपास ६३८९ कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येतोय. आग विझविण्यासाठी जळगाव, औरंगाबाद, जामनेर येथील अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. आगीत २२ ते २३ कोटी रुपयांच्या कापसाच्या गठाणी जळाल्याचा अंदाज आहे.