शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

औरंगाबाद येथे महिन्यातील पाचवा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 12:16 AM

मृत्यूचा सापळा बनलेल्या बीड बायपासवर अपघाताची मालिका सुरूच असून, भरधाव हायवा ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. अब्दुल अजीम अब्दुल रज्जाक (३२, रा. बाबर कॉलनी, कटकटगेट), असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या आठ महिन्यांतील हा १० वा बळी, तर आॅगस्ट महिन्यातील पाचवा बळी ठरला आहे.

ठळक मुद्देबीड बायपास : भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; सर्व्हिस रोडबाबत जाग येईना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मृत्यूचा सापळा बनलेल्या बीड बायपासवर अपघाताची मालिका सुरूच असून, भरधाव हायवा ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. अब्दुल अजीम अब्दुल रज्जाक (३२, रा. बाबर कॉलनी, कटकटगेट), असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या आठ महिन्यांतील हा १० वा बळी, तर आॅगस्ट महिन्यातील पाचवा बळी ठरला आहे.अब्दुल अजीम हा बायपासवरील एका गॅरेजवर मेकॅनिकचे काम करीत होता. सकाळी बदनापूर येथे एक गाडी बंद पडल्याने तिच्या दुरुस्तीसाठी अजीम गॅरेजवरून साहित्य घेऊन दुचाकी (एमएच-२० पीई १३१३) वर बदनापूरच्या दिशेने निघाला होता. देवळाई चौकापासून काही अंतरावर असताना भरधाव आलेल्या हायवा (एमएच ४४ ६०९) ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात चालक खाली पडून चाकाखाली चिरडला गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. डोक्याचा चेंदामेंदा होऊन रस्त्यावर मांसाचे तुकडेविखुरले होते. अपघाताचे हृदयद्रावक चित्र पाहून नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे तसेच त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक शाखेचे निरीक्षक भारत काकडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने अब्दुल अजीमचा मृतदेह पोलीस व्हॅनमधून घाटी रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला.बायपासवर महानुभाव आश्रम ते देवळाई चौकात किरकोळ अपघाताची नोंद होत नाही. परंतु गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या १२ घटना घडल्या, तर काही किरकोळ; परंतु १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.निष्पाप नागरिकांचे किती जीव घेणारबायपासवर वाहनांची संख्या वाढली असून, वाहतूक शाखेने पोलीस यंत्रणा कामाला लावली असली तरी अपघाताच्या मालिकेत खंड पडलेला नाही. जानेवारी ते आॅगस्टदरम्यान १० जणांना ट्रकने ‘यमसदनी’ पाठविले आहे. याला जबाबदार कोण, असा सवालदेखील परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.आमदार संजय शिरसाट, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बायपासची पाहणी करून वाहतुकीचा आढावा घेतला. पोलिसांना सुरक्षिततेविषयी सूचना करण्यात आल्या. मनपाचे अधिकारी ए. बी. देशमुख व सी. एम. अभंग यांनाही आयुक्तांनी सर्व्हिस रोडच्या कामाबाबत विचारणा केली.युवक धावले मदतीलाअपघाताचे वृत्त कळताच देवळाई परिसरातील युवक वजीर पटेल, शफिक पटेल हे घटनास्थळी धावले.अजीमच्या शरीराचे रस्त्यावर विखुरलेले तुकडे उचलून घाटी रुग्णालयात पाठविण्यासाठी पोहेकॉ. शेषराव चव्हाण यांना या युवकांनी मदत केली.अपघातामुळे रस्त्यावर अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. रेणुकामाता कमानीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.विरुद्ध दिशेने जाणाºयांवर कडक कारवाईस्थानिक नागरिकांनाच सोबत घेऊन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त हनुमंत भापकर, निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, भारत काकडे यांनी बायपासवरील अतिक्रमण आणि वाहतुकीची प्रत्यक्ष पाहणी केली. जालना रोडवर ज्याप्रमाणे समुपदेशन केले जाते, त्याप्रमाणे देवळाई चौकातही होते, अपघाताची कारणे शोधण्यासाठी विरुद्ध दिशेने जाणाºयांना ८ तास बसवून ठेवून समुपदेशनाची शिक्षा देण्यात येणार आहे.शिष्टमंडळाला दिलेहोते आश्वासनसातारा-देवळाईतील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन अपघात टाळण्याविषयी म्हणणे मांडले होते. त्यामुळे चिरंजीव प्रसाद स्वत: बायपासवर शुक्रवारी पाहणी करून अपघात टाळण्याविषयीच्या उपाययोजना शोधण्यासाठी आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू