- पोलीस नाईक गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाबासाहेब वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
- बॅंकेत पैसे काढण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मात्र व्यवस्थापकाने रांग लावणे, सॅनिटायझर आदी कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. अशा वेळप्रसंगी पोलिसांचीही मदत घ्यावयास पाहिजे होती. पण त्यांनी नियमांकडे दुर्लक्ष केले.
- कैलास प्रजापती, उपविभागीय पोलीस अधिकारी
----------------------
शिवूर जिल्हा बँक शाखेत १८ हजार ग्राहक असून त्यातील १२ हजार ग्राहक शेतकरी आहेत. केंद्राच्या शेतकरी सन्मान योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. याशिवाय खरीप पीक विमा २०२० ची रक्कमही खात्यावर आली आहे. संबंधित रक्कम काढण्यासाठी गर्दी झाली होती. मात्र शाखेत गर्दी नव्हती. दरवाजात दोन कर्मचारी बसवून ग्राहक आत सोडले जातात. शाखेबाहेर मात्र गर्दी होती. याशिवाय सोशल मीडियावर प्रसारित झालेला व्हिडिओ चुकीचा असून तो इतर जिल्ह्यातील बॅंकेचा आहे. कोणत्याही ग्राहकांना बॅंकेत येण्यापासून रोखता येत नाही.
- बाबासाहेब वाघ, बॅंक व्यवस्थापक
190521\img-20210519-wa0206.jpg
शिऊर जिल्हा मध्यवर्ती बँक च्या बाहेर जमलेली गर्दी