औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलल्यामुळे २० जानेवारी रोजी सकाळी क्रांतीचौक उड्डाणपुलाखाली दत्ता कचरू भोकरे (२८, रा. शिवाजीनगर) याने फवारणी करण्याचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरातून तीन मोबाइलची चोरी
औरंगाबाद : पवननगर येथील महिला पहाटे किचनमध्ये स्वयंपाक करीत असताना घरातून २४ हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १३ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘एमजीएम’समोरून दुचाकीची चोरी
औरंगाबाद : एमजीएम हॉस्पिटलमध्ये ड्यूटीवर गेलेल्या इसमाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १८ जानेवारी रोजी घडली. कलीम हकीम देशमुख (२४, रा. उमर कॉलनी, हर्सूल) याने नेहमीप्रमाणे दुपारी ३ वाजेच्या सुमारास एमजीएम हॉस्पिटलच्या गेट क्र. ९ समोर दुचाकी (एचएच २०- एआर- ९३७३) उभी केली. रात्री ७ वाजता दुचाकी तेथे दिसून आली नाही. याप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचा विनयभंग
औरंगाबाद : शेख रफिक ऊर्फ व्हाइटनर (रा. चिश्तिया कॉलनी) हा शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास चिप्स खात आविष्कार चौकाकडून सिडको एन-५ परिसरातील सह्याद्रीनगर येथे आला व ‘चिप्स खाती क्या’ असे म्हणत घरासमोर उभ्या असलेल्या महिलेचा हात पकडून तिला ओढले. याप्रकरणी सिडको ठाण्यात त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सव्वादोन लाखांचा सिगारेटचा साठा जप्त
औरंगाबाद : वैधानिक इशारा नसलेल्या सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांचा तब्बल सव्वादोन लाखांचा साठा सिटीचौक पोलिसांनी जुना बाजार येथील एका व्यापाऱ्याच्या गोदामातून जप्त केला. सिराज अहमद नियाज अहमद काजी (४६, रा. ए. आर. रेसिडेन्सी, देवडी बाजार) याने जुना बाजारातील नवाब प्लाझा शॉप क्र. २ मध्ये वैधानिक इशारा नसलेल्या सिगारेट व तंबाखूचा साठा केला होता. याची माहिती मिळाल्यावरून सिटीचौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मोसीन अली सय्यद यांनी छापा टाकून साठा जप्त केला. याप्रकरणी सिराज अहेमद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.