वाळूज महानगर : निष्काळजीपणे वाहन चालवून समोरच्या वाहनाला धडक देत दोन प्रवाशांना जखमी करणाऱ्या रिक्षा चालकाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपाली धांडे व शीतल धांडे (रा. अविनाश कॉलनी, वाळूज) या २४ जानेवारी रोजी सायंकाळी वाळूज येथून रिक्षाने (एमएच-२०, ईएफ - १७६६) रांजणगाव मार्गे बजाजनगर येथे कार्यक्रमाला जात होत्या. पावणे सहा वाजेच्या दरम्यान स्टरलाईट कंपनीकडून साई मंदिराकडे जाणाºया टेम्पोला रिक्षा चालकाने पाठीमागून जोराची धडक दिली. यात दिपाली व शीतल या जखमी झाल्या. त्यांना नागरिकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, महेश धांडे यांच्या तक्रारीवरुन रिक्षा चालका विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.