लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात अवैध दारुची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून पोलिसांच्या विशेष पथकाकडून अवैध दारु विक्रेत्यावर धाडसत्र सुरू आहे. ८ जुलै रोजी ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नायगाव तालुक्यातील गोळेगाव रस्ता येथे दारुचे ४ बॉक्स अन्य साहित्यासह २० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्माबाद येथील रेल्वेगेट नं. २ जवळ अवैध दारुविक्री सुरू होती. येथेही पोलिसांनी देशी दारुच्या ९६ बॉटल तसेच एक मोटारसायकल जप्त केली. नांदेड ग्रामीण ठाण्यातील लातूर फाटा ते विष्णूपुरी रस्त्यावर ७ हजार रुपयांची अवैध दारु सापडली. या प्रकरणी ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला. उमरी येथील मच्छीमार्केटमध्येही जवळपास तीन हजार रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जुगाऱ्यांना पकडलेनायगाव तालुक्यातील उमरी येथे जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख ४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.उमरी येथे साहेबराव मांजरमकर यांच्या शेतात ७ जुलै रोजी रात्री जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत नऊ जणांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दारुविक्री प्रकरणी गुन्हे दाखल
By admin | Published: July 10, 2017 12:10 AM