बीड : तालुक्यातील उमरद जहांगिर ग्रामपंचायतीअंतर्गत चार पाणीयोजना रबविण्यात आल्या़ त्यापैकी तीन योजनांचा २५ लाख इतका निधी समितीकडे आहे़ निधी बँक खात्यात जमा करा, अन्यथा गुन्हा नोंदविण्याची तंबी जि़प़ ने समितीला दिली आहे़उमरदमध्ये २००८- ०९ मध्ये राबविलेली योजना पूर्ण आहे़ २०११- १२ मध्ये गोरेवस्तीवर एक व भिल्ल वस्तीसाठी दोन योजना मंजूर झाल्या;पण समितीचे अध्यक्ष व सचिव यांनी योजनेसाठी आलेल्या एकूण निधीपैकी सुमारे २५ लाख ४१ हजार ७६८ रुपये इतकी रक्कम खात्यातून उचलली़ तक्रारी आल्यावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस़ व्ही़ चव्हाण यांनी १२ जानेवारी रोजी पाहणी केली होती़विनायक मेटे भेटले सीईओंनाशिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी गुरुवारी दुपारी दीड वाजता सीईओ नामदेव ननावरे यांची जि़प़ मध्ये भेट घेतली़ यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र मस्के, दिलीप गोरे, सुहास पाटील, अशोक लोढा आदी उपस्थित होते़ पाणी योजनांसह दुष्काळी उपाययोजनांवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
२५ लाख भरा, अन्यथा फिर्याद
By admin | Published: January 16, 2015 12:48 AM