लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : चित्रपट हे मानवी मनाला समृद्ध करण्याचे माध्यम आहे़, असे प्रतिपादन राष्ट्रीय पुरस्कार विजेते लघुपट दिग्दर्शक अमोल देशमुख यांनी केले़ परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात नुकताच कैझन पिक्चर्स अरभाट फिल्म क्लब पुणे, श्रीराम बाग टूरिझम फन पार्क व श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने चित्रपट रसास्वाद कार्यक्रम पार पडला़ या प्रसंगी ते बोलत होते़ यावेळी प्राचार्य डॉ़ बी़ यू़ जाधव, परभणी फिल्मचे रवि पाठक, डॉ़ संजय टाकळकर यांची उपस्थिती होती़ या कार्यक्रमात दिग्दर्शक अमोल देशमुख यांचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘औषध’ हा लघुपट दाखविण्यात आला़ यावेळी देशमुख यांनी प्रत्येक शॉटची माहिती, दिग्दर्शकाचा विचार, स्थळ, काळ, प्रकाश योजना इ. माहिती दिली़ चित्रपट कसा पहावा, याचे विवेचन केले़ त्र्यंबक वडसकर यांनी सूत्रसंचालन केले़ नागेश कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला़ सिद्धार्थ मस्के यांनी आभार मानले़
चित्रपट हे मानवी मनाला समृद्ध करण्याचे माध्यम
By admin | Published: July 01, 2017 11:43 PM