शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

अखेर १६ अधिकाºयांवरील दोषारोपपत्राचे प्रस्ताव आयुक्तांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:26 AM

येथील पुरवठा विभागाच्या गोदामातील २८ कोटी रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणात विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी दोषी १६ अधिकाºयांवर दोषारोपपत्र १ ते ४ चे परिपूर्ण प्रस्ताव १५ दिवसांत सादर करण्याचे २७ जुलै रोजी लेखी आदेश दिल्यानंतर जवळपास ३ महिन्यांनी हे प्रस्ताव आयुक्तांना सादर करण्यात आले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील पुरवठा विभागाच्या गोदामातील २८ कोटी रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणात विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी दोषी १६ अधिकाºयांवर दोषारोपपत्र १ ते ४ चे परिपूर्ण प्रस्ताव १५ दिवसांत सादर करण्याचे २७ जुलै रोजी लेखी आदेश दिल्यानंतर जवळपास ३ महिन्यांनी हे प्रस्ताव आयुक्तांना सादर करण्यात आले आहेत़परभणीतील पुरवठा विभागाच्या गोदामातून ४ कोटी ९७ लाख रुपयांच्या धान्याचा घोटाळा झाल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासात ही रक्कम २८ कोटी रुपयापर्यंत गेली़ या प्रकरणात पोलिसांनी ३७ पैकी (एक मयत) २२ आरोपींना अटक केली असून, १४ आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही़ या पार्श्वभूमीवर महसूल विभागाकडूनही या प्रकरणात अत्यंत मंदगतीने कारवाई सुरू आहे़ विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी या संदर्भात २७ जुलै रोजी परभणी जिल्हाधिकाºयांना पत्र पाठविले होते़ त्यामध्ये १ ते ९ आॅगस्ट २०१६ या कालावधीत करण्यात आलेल्या तपासणीत धान्याचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले़ या तपासणीत जानेवारी २०१५ ते जुलै २०१६ या कालावधीत संग्रह पडताळणी केली नसल्याचे पुस्तिकेवरून दिसून आल्याची बाब अहवालात नमूद करण्यात आली होती़ त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामाचा नियमित व फेर संग्रह पडताळणीचा वार्षिक कार्यक्रम जिल्हाधिकाºयांनी १५ जानेवारी २०१५, २१ डिसेंबर २०१५, २८ डिसेंबर २०१५ नुसार निर्गमित केला होता़ त्यानुसार परभणीतील शासकीय धान्य गोदामाची संग्रह पडताळणी करण्यात कसूर केल्या प्रकरणी तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, तत्कालीन मानवतचे प्रभारी तहसीलदार मिसाळ, सेलुचे तहसीलदार आसाराम छडीदार, गंगाखेड तत्कालीन प्रभारी तहसीलदार मिलिंद गायकवाड, पूर्णाचे तहसीलदार पांडूरंग माचेवाड, सोनपेठचे तत्कालीन प्रभारी तहसीलदार महादेव सुरासे, सोनपेठचे तहसीलदार जीवराज डापकर, गंगाखेडचे तत्कालीन तहसीलदार अविनाश शिंगटे, जिंतूरचे तत्कालीन तहसीलदार जी़डी़ वळवी, पाथरीचे तत्कालीन तहसीलदार गाडे, तत्कालीन उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, पालमचे तत्कालीन तहसीलदार तथा सध्याचे लातूरचे उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, पालमचे तत्कालीन तहसीलदार राहुल गायकवाड, तत्कालीन सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी एल़ के़ मुंजाळ, नायब तहसीलदार एल़एऩ धस, चित्रा देशमुख या अधिकाºयांना नोटिसा बजावण्यात येऊन त्यांचा खुलासा मागविण्यात आला होता़ या पैकी वेणीकर व मुंजाळ वगळता इतर अधिकाºयांविरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ चे नियम १० खाली विभागीय चौकशी सुरू करण्याबाबत विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली होती़ त्यानुसार या अधिकाºयांवर दोषारोपपत्र, १ ते ४ परिपूर्ण प्रस्ताव १५ दिवसांत सादर करावेत, असे आदेश आयुक्त भापकर यांनी २७ जुलै रोजी दिले होते़ त्यानंतर जवळपास तीन महिन्यानंतर या प्रकरणातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने गेल्या आठवड्यात पाठविण्यात आला आहे़ तशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिली़ आता विभागीय आयुक्त कार्यालयातूनही या प्रस्तावांवर कधी कारवाई होईल, हे सांगणे कठीणच आहे़ कारण धान्य घोटाळा प्रकरणात महसूल विभागाने आतापर्यंत उदासिन भूमिका घेतली आहे़ या प्रकरणात तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी दिलीप कच्छवे, तहसीलदार संतोष रुईकर यांना निलंबित करण्यात आले होते़ परंतु, हे दोन्ही अधिकारी आता सेवेत पूर्ववत रुजू झाले आहेत.