लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पैशाच्या आमिषाने महिला आणि मुलींना राजस्थानमध्ये नेऊन त्यांची विक्री करून लग्न लावणाºया रॅकेटविरोधात शनिवारी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणी तक्रारदार महिलेला राजस्थानात विक्री करणाºया एका दलाला पोलिसांनी अटक केली.पवनकुमार (रा.मुकुंदवाडी) असे अटकेतील आरोपी दलालाचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना मुकुंदवाडी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रेमसागर चंद्र्रमोरे म्हणाले की, कैसर कॉलनी येथील रहिवासी २५ वर्षीय सीमा (नाव बदलले) हिला महिनाभरापूर्वी केटरिंगच्या कामासाठी परप्रांतात २० दिवस राहिल्यानंतर ४० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून आरोपी पवनने फरजानाच्या मदतीने राजस्थानमधील पालनपूर येथे नेले. तेथे पंडित नावाच्या एका चहा विक्रेत्याशी तिचे बळजबरीने लग्न लावल्यानंतर पीडितेला तेथेच सोडून पवन पळून आला होता. आई कॅन्सरने आजारी असल्याने तिला भेटायला जायचे असल्याची थाप मारून पीडिता पंडित नावाच्या खरेदीदाराला घेऊन औरंगाबाद बसस्थानकावर आली. तेथे त्याची नजर चुकवून ती घरी परतली. यानंतर तिने पवनकडे पैशाची मागणी केली असता त्याने रक्कम दलाल फरजाना हिच्याकडे दिल्याचे सांगितले. फरजानानेही तिला कामाचे पैसे देण्यास नकार दिला आणि याप्रकरणी पोलिसांत गेली, तर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी तिने दिली. एवढेच नव्हे तर पवनने तिला एका ठिकाणी बोलावून एका व्यक्तीला ती दाखवून तिला विक्री करण्याची तयारी त्याने सुरू केली होती. यावेळी त्याच्या तावडीतून तिने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली होती.
अखेर ‘त्या’ आरोपींविरोधात महिलेला विक्री केल्याचा गुन्हा; दलाल अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 1:21 AM