लोकमत न्यूज नेटवर्कबासंबा/हिंगोली : शहरातील माऊली नगर येथील गणेश श्रीकृष्ण शिंदे या युवकाचे सहा जणांनी १९ आॅगस्ट रोजी रात्री ९.३०च्या सुमारास अपहरण केले होते. त्याचा उस्मानाबाद जिल्ह्यात शोध लागल्यानंतर आज त्याला पालकांच्या स्वाधीन केले. यातील पाच आरोपी पकडले व एक आरोपी मात्र फरार झाला असून लवकर त्यास ताब्यात घेण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी २२ आॅगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.गणेश हा एटीएममधून पैसे काढण्यासाठी हिंगोली शहरात आला व त्याचे सहा जणांनी अपहरण केले. गणेशच्याच मोबाईलवरून त्याच्या वडिलांना संपर्क साधून दोन लाख न दिल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. अपहरणकर्त्यांनी त्याला कारच्या डिकीत डांबून ते विविध जिल्ह्यात फिरत होते. उस्मानाबाद जिल्ह्यात ढाबाचालकाशी वाद झाला अन् आरोपी पकडले गेले. ढाबचालकाने गणेशची डिकीतून सुटका करून गणेशच्या घरच्यांशी संपर्क साधून मुलगा सुखरुप असल्याचे सांगितले. नंतर गणेशला वाशी पोलीसांच्या स्वाधीन केले. आरोपी ऋषिकेश महादेव कोकने वय १८ रा. पारगाव, रोहित हनुमंत राक्षे वय २२ रा. लक्ष्मीनगर, मोशी, रामेश्वर अप्पसाहेब थवर वय २१ रा. आळंदी, ता. खेड, गजानन अंकुश शिंदे वय १८ रा. सरस्तेवती, ता. हवेली, जि. पुणे यांना अटक केली आहे. यातील अंकुश त्रिभुवन हा आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. त्याचा शोध सुरू आहे.आईचा उपवास सुटलागणेश १९ तारखेपासून अपहरणकर्त्यांच्या ताब्यात असल्याने त्याची आई राधाबाई व वडील श्रीकृष्ण यांच्या जीवात जीव नव्हता. त्यांनी अन्नच सोडले होते. तो मंगळवारी सायंकाळी साडेपाचला घरी आला अन् त्याला बिलगून त्या रडल्या. त्याला पेढा भरविला. गल्लीतील मंडळीही जमली. आईची ही अवस्था बघून इतरांचेही डोळ्यात आश्रू आले होते. त्याला विचारपूस केली जात होती. अनुभवलेला थरार सांगताना त्याचेही डोळे पाणावले होते. शिंदे यांना किरण डहाळे, अमित रटनालू, अॅड. राजू गोटे, गरड, रवी जैस्वाल यांनी मदत केली.
...अखेर अपहृत युवक आई-वडिलांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:56 PM