कुंभार पिंपळगाव : सध्या इंटरनेटची डिजीटल क्रांतीकडे वाटचाल सुरू आहे. त्यातच इंटरनेट व्हॉटस्आप, फेसबुकचा वापरात मोठी वाढ झाली आहे. फेसबुक, व्हॉटसअपवर तासंतास वेळ घालवला जातो. तर कधी याच उपकरणामुळे हरवलेली व्यक्ती सापडते. काही अशीच घटना घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथील वारकरी शिक्षण संस्थेतून पळून गेलेला १७ वर्षीय परमेश्वर शंकर जाधव याच्या बाबतीत घडली.२४ नोव्हेंबर रोजी परमेश्वर हा संस्थेतून पळून गेला. त्याचा शोध पालकासह संस्थाचालक, पोलिसांनी घेतला. तब्बल चार महिन्यांचा कालावधी शोध घेवूनही परमेश्वर सापडला नसल्याने अखेर सर्वांनी शोध थांबवला आणि परमेश्वर सापडणार नसल्याने सर्वजण चिंतेत होते. १४ मार्च रोजी परमेश्वरच्या फेसबुकचा डीपी (प्रोफाईल चित्र ) बदलले आणि आई-वडिलांचा जीवात जीव आला. याचाच आधार घेत पोलिसांनी परमेशवरचा शोध घेवून पूणे येथून त्याला शोधून आणले.ज्ञानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्था जांबसमर्थ येथील परमेश्वर शंकर जाधव (१७) हा शिक्षण संस्थेतील विद्यार्थी २४ नोव्हेंबर २०१६ रोजी बेपत्ता झाला होता. सदरील घटनेमुळे घनसावंगी तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. बेपत्ता परमेश्वराचा शोध मुलाचे वडील, संस्थाचालक यांनी घेण्यास सुरूवात केली. परंतु शोध न लागल्याने अखेर परमेश्वरच्या वडिलांनी घनसावंगी पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आणि शोध सुरू होता. मुलगा सापडल्याने पालकांतून समाधान व्यक्त होत आहे.
अखेर बेपत्ता मुलाचा फेसबुकमुळे शोध
By admin | Published: March 28, 2017 12:06 AM