औरंगाबाद : विद्यापीठाला तब्बल दोन महिन्यांनंतर पीएच.डी. प्रवेश नोंदणीसाठी अखेर मुहूर्त सापडला. ऑनलाइन नोंदणीसाठी सोमवारपासून लिंक सुरू करण्यात येणार असून ‘पेट’ उत्तीर्ण तसेच नेट, सेट, एम.फिल.धारकांना ३० जूनपर्यंत नोंदणी करता येईल. तथापि, ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत विद्यापीठात प्रत्यक्ष ‘हार्ड कॉपी’ जमा करावी लागणार आहे. पीएच.डी.साठी विषयनिहाय रिक्त जागा व संशोधक मार्गदर्शकांची यादी संकेतस्थळावर घोषित करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही यादी अंतिम करण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. शिरसाठ, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. धनश्री महाजन व परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील आदी उपस्थित होते.
विद्यापीठाने ६ मार्च रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार २२ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत ‘पेट’ पात्र विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी. प्रवेशासाठी नोंदणीची तारीख जाहीर केली होती. मात्र, ‘यूजीसी’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘पेट’ आयोजित करण्यापूर्वीच मार्गदर्शक व त्यांच्याकडे विषयनिहाय रिक्त जागांची यादी जाहीर करणे आवश्यक होते; परंतु विद्यापीठाने यादी जाहीर न करताच ‘पेट’चे आयोजन केले. त्यामुळे पीएच.डी. प्रवेशाची ही प्रक्रिया आतापर्यंत रखडली होती. चौकट................................
गाइड आणि रिक्त जागांचा तपशील
कंसातील आकडेवारी अनुक्रमे गाइड व रिक्त जागांची अशी, बायो केमिस्ट्री- (२, १), बॉटनी- (५७, २१२), केमिस्ट्री- (८७, ३२८), फिजिक्स- (६८, २७४), कॉम्य्युटर सायन्स- (१५, ८), इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग- (५, १४), एन्व्हायरन्मेंटल सायन्स- (३, १३), फूड टेक्नॉलजी- (३, १३), जिओलॉजी- (६, ९), गणित- (१३, ३८), मेकॅनिकल इंजिनिअरिंग- (९, ३३), मायक्रो बॉयोलॉजी- (१४, ३९), फार्मसी- (३१, १०२), स्टॅटिस्टिक्स- (४, १२), झूलॉजी- (८२, ४०८), बायोटेक्नॉलॉजी- (२, ४), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग- (२, ९), कॉमर्स- (७२, १९०), मॅनेजमेंट सायन्स- (१२, ३२), टूरिझम ॲडमिनिस्ट्रेशन- (२, २), अर्थशास्त्र- (५६, १९९), इंग्लिश- (७३, १५), जिओग्राफी- (३९, ११०), हिंदी- (९७, ४३१), इतिहास- (४६, १४५), लॉ- (१४, ४३), मराठी- (१००, २७५), पाली अँड बुद्धिझम- (१, ०), राज्यशास्त्र- (४९, १६३), मानसशास्त्र- (१७, ३४), लोकप्रशासन- (२५, ८३), संस्कृत- (२, ०), समाजशास्त्र- (३७, १२३), उर्दू- (१०, १९), अरेबिक- (३, ७), नाट्यशास्त्र- (७, ८), शिक्षणशास्त्र- (३१, ७९), फाइन आर्ट- (१, ०), होम सायन्स- (१२, ४०), लायब्ररी सायन्स- (२०, ५१), वृत्तपत्रविद्या- (२, २), फिजिकल एज्युकेशन- (५९, १७६), समाजकार्य- (१०, ३२), म्युझिक- (४, १२).