दिवसभरात तब्बल ४४७१ नागरिकांची तपासणी
औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत प्रशासनाने कोरोना चाचण्याही वाढविल्या आहेत. सोमवारी शहरात तपासणीचा नवीन उच्चांक महापालिकेने केला. ४ हजार ४७१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. १८६१ नागरिकांची अँटिजन तपासणी केली. त्यामध्ये ४५० पॉझिटिव्ह आढळले. २६१० संशयित रुग्णांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. मंगळवारी सकाळी त्यांचा अहवाल महापालिकेला प्राप्त होईल.
प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी बाळकृष्ण राठोडकर
औरंगाबाद : महापालिकेच्या प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्या. सध्या त्या घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे महापालिकेतील आरोग्य विभागातील डॉ. बाळकृष्ण राठोडकर यांच्याकडे प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारीचा पदभार सोपविला आहे.