शहरं
Join us  
Trending Stories
1
पूजा दिलीप खेडकरचे वडील निवडणुकीला उभे राहिले; लोकसभेला मनोरमा पत्नी होती, विधानसभेला 'नाही' दाखविले
2
मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
3
केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?
4
Ajit Pawar: भाजपचा विरोध, तरीही नवाब मलिकांना उमेदवारी का दिली? अजित पवारांनी मांडली भूमिका...
5
काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा
6
Vidhan Sabha Election: करमाळा-माढा मतदारसंघात प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढली; कारण...
7
सध्या मराठा समाज कुणासोबत महाविकास आघाडी की महायुती? अजित दादांनी स्पष्टच सांगितलं
8
Life lesson: हो! जीवंतपणी स्वर्ग आणि नरक पाहणे शक्य आहे; 'असा' घ्या अनुभव!
9
“सांगली पॅटर्न लोकप्रिय नाही, मित्र पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही अन्यथा...”: संजय राऊत
10
Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेआधी घरातून 'हे' फोटो आधी बाहेर काढा; होऊ शकते आर्थिक नुकसान!
11
प्रेग्नंन्ट आहे दिव्यांका त्रिपाठी, ३९व्या वर्षी होणार आई! दिवाळी पार्टीत फ्लॉन्ट केला बेबी बंप
12
"आजपर्यंत राज ठाकरे नक्कल करायचे, आता...", अजित पवार यांचा शरद पवारांना टोला
13
Gold Price Outlook: पुढच्या दिवाळीपर्यंत सोनं १ लाखांपार जाण्याची शक्यता; चांदीचीही चमक वाढणार
14
Ajit pawar: शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? अजित पवार म्हणाले, "राजकारणात काहीही होऊ शकते"
15
दिवाळीतील गुरुवार: इच्छा आहे, पण स्वामी सेवा शक्य होत नाही? ‘अशी’ करा स्वामी समर्थ मानसपूजा
16
शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...
17
मोठा खेळ झाला! माजी आमदार एक मिनिट लेट झाले, निवडणुकीचा अर्ज भरण्यास मुकले
18
अखेर तो क्षण आलाच.... तब्बल २८ वर्षांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पुन्हा जुळून येणार योग
19
Swiggy IPO: कधी येणार स्विगीचा आयपीओ, किती आहे प्राईज बँड? ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय, जाणून घ्या

अखेर अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमध्ये एमआयडीसीला शासनाची मंजूरी

By बापू सोळुंके | Published: April 10, 2023 6:59 PM

सिल्लोड एमआयडीसीकरीता ३७५ एकर जमिनीचे भूसंपादन होणार

छत्रपती संभाजीनगर: सिल्लोड येथे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या मागणीला यश आले आहे. पहिल्या टप्प्यात केवळ शासकीय गायरान जमिनीवर एमआयडीसी विकसित करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाने घेतला. यांतर्गत सिल्लोड जवळील रजाळवाडी, मोंढा बुद्रूक , मंगरूळ व डोंगरगाव येथील ३७५एकर (१५० हेक्टर) शासकीय जमिनीवर एमआयडीसी उभारण्यास महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने(एमआयडीसी) नुकतीच मंजूरी देण्यात आली आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी हा विशेष उद्योगमंत्र्याकडे लावून धरला होता. त्यांच्या या मागणीला यश आले आहे. सिल्लोड येथे पहिल्या टप्प्यात १५० हेक्टरवर औद्योगिक वसाहत उभारण्यास मंजूरी दिली आहे. सिल्लोड जवळील रजाळवाडी, मोंढा बुद्रूक, मंगरूळ आणि डोंगरगाव येथील सरकारी गायरान जमिनीची यासाठी निवड करण्यात आली आहे. सिल्लोड येथे एमआयडीसीची मागणी पुढे आल्यानंतर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सिल्लोड येथील शासकीय आणि खाजगी जमिनीची पहाणी केली. 

यानंतर एमआयडीसीचे सीईओ आणि अन्य अधिकाऱ्यांनीही सिल्लोड येथे जाऊन जमिनीची पहाणी केल्यानंतर शासनास सविस्तर अहवाल दिला होता. सुरवातीला एक हजार एकरवर एमआयडीसी उभारण्याची मागणी पुढे आली होती.मात्र जिल्ह्यातील शेंद्रा, बिडकिन डिएमआयडीसीमध्ये पंचतारांकित सुविधा असलेले औद्योगिक भूखंड शिल्लक असताना सिल्लोड येथे उद्योजक उद्योग उभारण्यासाठी भूखंड खरेदी करतील का, याबाबत सांशकता एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना आहे. तेव्हा पहिल्या टप्प्यात केवळ शासकीय जमिनीवर एमआयडीसी उभत्तरण्यात यावी,या भूखंडांवर उद्योग उभे राहिले तर मागणीनुसार दुसऱ्या टप्प्यात खाजगी जमिनीचे भूसंपादन करावे अशी, सूचना करण्यात आली होती. दरम्यान नुकतीच राज्यशासनाच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सिल्लोड येथे १५०हेक्टर सरकारी जमिनीवर भूखंड उभारण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी रजाळवाडी, मोढा, मंगरूळ आणि डोंगरगाव येथील शासकीय जमिनीचे भूसंपादन करण्यास मंजूरी दे्ण्यात आली.

जिल्ह्यात सातवी एमआयडीसीछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आधीच वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा पंचतारांकित, रेल्वेस्टेशन, पैठण आणि बिडकीन आदी ठिकाणी एमआयडीसी कार्यरत आहेत. आता सिल्लोड येथे औद्योगिक वसाहतीला मंजूरी मिळाल्याने ग्रामीण भागातही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. मागील २० वर्षापासून प्रलंबित वैजापूर येथील एमआयडीसी तातडीने मार्गी लागावी, यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहे.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारMIDCएमआयडीसीEknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबाद